ETV Bharat / state

Speed Boat Accident : संभाजीराजे आणि मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले, मांडवा जेट्टीवर आदळली स्पीडबोट - उदय सामंत बोट अपघात

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्पीडबोटीला अपघात झाला. सुदैवाने त्यातून ते वाचले आहेत. मांडवा जेट्टीच्या खांबावर स्पीडबोट आदळली होती. मात्र, नंतर बोटीवर चालकाने नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

speedboat hit the Mandwa jetty
speedboat hit the Mandwa jetty
author img

By

Published : Apr 3, 2023, 7:00 PM IST

Updated : Apr 3, 2023, 8:10 PM IST

ठाणे - मंत्री उदय सामंत आणि माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांना घेऊन जाणारी स्पीड बोट जेटीच्या खांबाला धडकली. सोमवारी रायगडमधील मांडवा जेटीवर ही बोट धडकली. सुदैवाने सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

स्पीडबोल चालकाचे नियंत्रण - मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी रायगडमधील अलिबाग येथे जात होते. या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मुंबईहून आम्हाला घेऊन जाणारी स्पीडबोट मांडवा जेट्टीत शिरली असता ती एका खांबावर आदळली. मात्र, बोट चालकाने लगेच नियंत्रण मिळवले.

  • आज सकाळी शिवराज्याभिषेक नियोजन बैठकी करिता मी व ना. उदय सामंत मुंबईहून मांडव्यास बोटीने जात असताना मांडवा जेटीवर बोटीस किरकोळ अपघात झाला. आम्ही दोघे व आमचे सर्व सहकारी सुखरूप असून कोणतीही इजा झालेली नाही.

    — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) April 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोठा अनर्थ टळला - सुरुवातीला काय होत आहे ते आम्हाला कळले नाही पण, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. योगायोगाने काही दिवसांपूर्वी मी प्रवास करत असताना बोटीला बिघाड झाला होता व त्यावेळीही मोठा अनर्थ टळला होता, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

आढावा बैठकीला हजेरी - छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ल्यावर 350 वा राज्‍याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याची तयारी सध्या रायग़ड किल्ल्यावर जोरदार सुरू आहे. याच तयारीचा आढावा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधीकरणाचे अध्‍यक्ष छत्रपती संभाजीराजे तसेच राजगडचे जिल्हाधिकारी, आयुक्त व वरिष्ठ अधिकारी यांनी घेतला आहे. या आढावा बैठकीसाठी उदय सामंत व संभाजीराजे छत्रपती हे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

संभाजीराजेंचे ट्विट - आज सकाळी शिवराज्याभिषेक नियोजन बैठकीकरिता मी व मंत्री उदय सामंत मुंबईहून मांडव्यास बोटीने जात असताना मांडवा जेटीवर बोटीस किरकोळ अपघात झाला. आम्ही दोघे व आमचे सर्व सहकारी सुखरूप असून कोणतीही इजा झालेली नाही. दुपारीच बैठक आटोपून पुण्यदिनानिमित्त छत्रपती शिवरायांना नतमस्तक होण्यासाठी आता दुर्गराज रायगडवर गेलो होतो. सर्वांनी जी काळजी व्यक्त केली त्याबद्दल मी ऋणी आहे, असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

हेही वाचा - Boat Sink In Lake : तलावात बोट उलटल्याने पाच तरुणांचा मृत्यू, एक बेपत्ता

Last Updated : Apr 3, 2023, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.