रायगड - भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली आहे. त्यांना काँग्रेस आघाडीबरोबर जायचेच नव्हते, पुन्हा भाजपचे सरकार यावे यासाठीच त्यांनी आघाडी होऊ दिली नाही, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला आहे. महाड येथे सत्यागृह दिनाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
कोरेगाव-भीमा येथील कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांतच प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील जिनींग प्रेसींग करणाऱ्या सम्यक कृषी उत्पादक सहकारी संस्थेला राज्य सरकारने ५ कोटी रूपये भागभांडवल मंजूर केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतली. बाबासाहेबांचा पक्ष वंचित आघाडीत सामील करून संपवला असल्याची टीका जगदीश गायकवाडांनी केली.
वंचित बहुजन आघाडीला कोकणात कोणतेच यश मिळणार नसल्याने ही आघाडी याठिकाणी फेल जाणार आहे. वंचित व मुस्लीम मते मिळविण्यासाठी ही आघाडी झाली असल्याचेही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.