ETV Bharat / state

बहिण ओवाळीते भाऊराया रक्षाबंधन सणाला; बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन - रक्षाबंधन बातमी

रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो.

rakshabandhan
भाऊराया रक्षाबंधन सणाला
author img

By

Published : Aug 22, 2021, 5:25 PM IST

रायगड - रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो. असून जो उत्सव सर्वाना अखंड प्रेम, उत्साह, स्नेहभाव, संबंधामध्ये मधुरता आणि पवित्रता घेऊन येतो. या वर्षाची रक्षाबंधन सण हा 22 ऑगस्ट संपन्न झाल्याने सर्वच ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बहिण ओवाळीते भाऊराया, रक्षाबंधन सणाला अशी गुणगुण खालापूर तालुक्यात सर्वच ऐकावयास मिळाली.

प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन
रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. जेव्हा स्त्री स्वतः असुरक्षित जाणते. तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

हे आहे रक्षाबंधनाचे महत्व

या वातावरणात सगळीकडे प्रसन्नता आणि प्रफुल्लितपणा जाणवत असते. सर्वांचे चेहरे आनंदाने चमकत असतात. काही कारणास्तव भावाबहीणीमध्ये काही मतभेद झाले असले तरीही या दिवशी सगळी दुःखे, भांडणे विसरून दोघे भाऊबहीण पुन्हा एकत्र येतात. भारतीय संस्कृतीमधील ही काही क्षणांची परंपरा लहानपणापासूनच एक भाऊ आणि बहीण यांना एका निरागस बंधनामध्ये घट्ट बांधून ठेवते आणि त्यांच हे नातं अतूट आणि परम पवित्र मानले जाते.

rakshabandhan
प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन

रक्षण आणि पवित्रतेची राखी
जी पवित्र राखी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर बांधते त्या रंगीत धाग्यामध्ये बहीणीचा आपल्या भावाला एक अबोल भेट असते. की दादा आज तुझी ही बहीण या आशेने राखी बांधत आहे की, भविष्य काळामध्ये जेव्हा कधी मला तुझी गरज असेल तेव्हा याच हातांनी तू मला मदत करशील, माझे रक्षण करण्यास समर्थ असशील. या सणाची प्राचीन काळापासून अशी समजूत आहे की, बहीण ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्याकडे प्रत्येक बिकट परिस्थितीत येणाऱ्या समस्यांच्या वेळी मदतीची आणि सहानुभूतीची आशा ठेवते. तर जीवनात कधीही जर बहिणीच्या आब्रूवर किंवा तिच्या जीवनात काहीही संकटे आली तर त्यावेळी तो भाऊ तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहील.

भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिण करते प्रार्थना
रक्षाबंधन सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते. तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते. म्हणून रक्षाबंधन सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भावाने रक्षण करण्याचे द्यावे वचन
प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना त्यांच्याकडून एक वचन घ्यायला हवे की, ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या बहिणींना निर्मळ दृष्टीने पाहाता आणि तिची रक्षा करणे हे आपले कर्तव्य समजतात. त्याप्रमाणे भारतातीलच नव्हे ,परंतु संपूर्ण विश्वातील स्त्रियांना तुम्ही बहिणीच्या दृष्टीने पाहून त्यांच्याही सुरक्षिततेचा विचार करा. जेव्हा प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून ही प्रतिज्ञा करवून घेईल, तेव्हाच जगातील प्रत्येक मुलगी, बहीण आणि माता या सुरक्षित राहतील.

रक्षाबंधन सणाला अनन्यसाधारण महत्व
बहिण भावाच्या अतूट नात्याचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन सणाची ओळख असल्याने बहिण भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणूनही या सणाला ओळखले जात आहे. तसेच प्रत्येक भावाने या दिवशी अशी संकल्पना केली पाहिजे की, आपण आपल्या सख्खा बहिणीला सन्मान देतो. तशीच वागणूक इतरांच्या बहिणींना दिल्यास इतरांच्या बहिणीही समाजात ताठ मानेने जगतील आणि त्यांना समाजात चांगले काम करता येईल.
हेही वाचा - 'मी नाराज हा शोध नारायण राणेंनी कुठून लावला माहित नाही; ते महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.