ETV Bharat / state

Gold Medals In International Swimming Competitions : आंतराराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तिघांनी कमावली सहा सुवर्ण पदके - सातवी आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा

"संयुक्त भारत खेल फाउंडेशन"च्या (Samyukt Bharat Khel Foundation) सातव्या आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये (7th International Sports Competition) जलतरण विभागामध्ये उरणमधील तीन स्पर्धकांनी सहभागी होत प्रत्येकी दोन अशा एकूण सहा सुवर्ण पदकांची कमाई केली (Raigad Uran trio won six gold medals) आहे. मध्यप्रदेश येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आर्यन विरेश मोडखरकर, हितेश भोईर आणि जायदीप सिंग या तीन स्पर्धकांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. Latest news from Raigad, Raigad Update

Gold Medals winner
सुवर्णपदक विजेते
author img

By

Published : Nov 19, 2022, 8:35 PM IST

रायगड : नेपाळ येथे झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशन"च्या (Samyukt Bharat Khel Foundation) सातव्या आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये (7th International Sports Competition) जलतरण विभागामध्ये उरणमधील तीन स्पर्धकांनी सहभागी होत प्रत्येकी दोन अशा एकूण सहा सुवर्ण पदकांची कमाई केली (Raigad Uran trio won six gold medals) आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चूरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या तीनही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवला आहे. Latest news from Raigad, Raigad Update

तीनही स्पर्धकांवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव - संयुक्त भारत खेल फाउंडेशन यांच्यावातीने इंदोर, मध्यप्रदेश येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आर्यन विरेश मोडखरकर, हितेश भोईर आणि जायदीप सिंग या तीन स्पर्धकांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. तर तिघांनी यावेळी एकूण नऊ सुवर्ण पदकांची लूट केली होती. या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धाँसाठी या तीनही जलतरणपटुंची निवड झाली होती. 19 नोव्हेंबर येथे झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशच्या"सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाँमध्ये जलतरण विभागातील स्पर्धेमध्ये आर्यन विरेश मोडखरकर याने 17 वयोगटामधील 50 मी. बटरफ्लाय आणि 100 मी. फ्रिस्टाईल या प्रकारात स्पर्धा करत दोनही स्पर्धाँमध्ये सुवर्ण पदकांची कामाई केली आहे. तर हितेश भोईर याने 30 वयोगटामधील 50 मी. फ्रिस्टाईल आणि 200 मी. आयएम या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. जयदीप सिंग यानेही 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामधील सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. उरणच्या या त्रिकुटाने देशाचे प्रतिनिधित्व करत अंतरराष्ट्रीय स्थरावरील सहा सुवर्ण पदकांची लूट केल्याने, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नगरपरिषदेने सुविधा पुरवाव्या, पालकाची मागणी - उरण नगरपरिषदेच्या जलतरण तलावामध्ये अपुऱ्या सुविधा आणि मिळणाऱ्या अपुऱ्या वेळात केलेल्या मेहनतीचे फळ या तीनही स्पर्धकांना मिळाले असून, यापुढेही अधिक मोठा पल्ला गाठायचा असल्याने, नगरपालिकेने सुविधा उपलब्द करुन द्याव्या अशी मागणी पालकांमधून होत आहे. ज्यामुळे या तीनही स्पर्धकांकडून प्रेरणा घेत इतर जलतरणपटू आपले नाव आंतरराष्ट्रीय स्थरावर कमावतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.