ETV Bharat / state

अजगराची हत्या लाईव्ह करणं पडलं महागात, पाच जणांना अटक - लाईव्ह व्हिडिओ

पेण तालुक्यातील खरबाची वाडी या गावातील नितीन लहू शिद, विजय बाळाराम शिद, एकनाथ धर्मा वाघ, हरिश्चंद्र येसू शिद, राम लक्ष्मण भल्ला या पाच तरुणांनी गावा जवळच्या जंगलात एक मोठा अजगर पकडला. अजगराला मारताना त्याचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा मोह या तरुणांना आवरला नाही. मात्र तो प्रकार त्यांच्या अंगाशी आला आहे.

अजगराची हत्या लाईव्ह करणं पडलं महागात, पाच जणांना अटक
author img

By

Published : Nov 19, 2019, 10:12 PM IST

रायगड - सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करण्याची नशा तरुणांमध्ये हल्ली वाढत आहे. सुसाट गाड्या चालवताना, अती उंच ठिकाणी गेल्यावर किंवा ट्रेकिंग करतानाही तरुणांना लाईव्ह व्हिडीओ करण्याची हौस असते. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा लाईव्ह व्हिडिओ करणे पेण मधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लाईव्ह झाल्यामुळे पेण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरुणांना अटक केली आहे.

पेण तालुक्यातील खरबाची वाडी या गावातील नितीन लहू शिद, विजय बाळाराम शिद, एकनाथ धर्मा वाघ, हरिश्चंद्र येसू शिद, राम लक्ष्मण भल्ला या पाच तरुणांनी गावा जवळच्या जंगलात एक मोठा अजगर पकडला. अजगराला मारताना त्याचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा मोह या तरुणांना आवरला नाही. मात्र तो प्रकार त्यांच्या अंगाशी आला आहे.

अजगराला मारताना व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने सहाय्यक वन संरक्षक अलिबाग किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पेण वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, धामणी येथील वनपाल जे. आर. घरत, पेणचे वनपाल चौधरी, निधवली वनपाल ए.एम. काटकर, आपटे वनपाल आडे, गागोदे वनपाल अडकर यांच्यासह पेण पोलीस पथकाने खरबाची वाडी येथे छापा टाकून पाचही जणांनी अटक केली.

पाच संशयित आरोपींना वन्य जीव संरक्षक कायदा १९७२ चे कलम ९,५१,५२ अन्वये अटक करण्ता आली आहे. या पथकाला खरबाची वाडी येथे घटनास्थळी मृत अजगराची चरबीचे अवशेष तसेच रक्ताचे थेंब आढळून आले असल्याची माहिती पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी दिली. या आरोपींना आज पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हा दाखल होताच व्हिडिओ केला डिलीट -
वनाधिकारी यांनी गुन्हा दाखल करताच या तरुणांनी सोशल मीडियावर वरील हा व्हिडीओ डिलीट केला. या व्हिडीओ मध्ये या तरुणांनी अजगराला मारुन त्याच्या शरीराचे तुकडे करताना दिसून आले आहेत.

Intro:अजगराची हत्या लाईव्ह करणे पडले महागात

पेण मध्ये पाच जणांना अटक

पेण-रायगड

सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करण्याची नशा तरुणांमध्ये हल्ली वाढत आहे. सुसाट गाड्या चालवताना, अति उंच ठिकाणी गेल्यावर किंवा ट्रेकिंग करतानाही तरुणांना लाईव्ह व्हिडीओ करण्याची हौस असते. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करणे पेण मधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लाईव्ह झाल्यामुळे पेण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरुणांना अटक केली आहे.Body:पेण तालुक्यातील खरबाची वाडी या गावातील नितीन लहू शिद, विजय बाळाराम शिद, एकनाथ धर्मा वाघ, हरिश्चंद्र येसू शिद, राम लक्ष्मण भल्ला या पाच तरुणांनी गावा जवळच्या जंगलात एक मोठा अजगर पकडला. अजगराला मारताना त्याचा सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करण्याचा मोह या तरुणांना आवरला नाही, मात्र तो त्यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. अजगराला मारताना व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने सहाय्यक वन संरक्षक अलिबाग किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पेण वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, धामणी येथील वनपाल जे.आर.घरत, पेणचे वनपाल चौधरी, निधवली वनपाल ए.एम. काटकर, आपटे वनपाल आडे, गागोदे वनपाल अडकर यांच्या सह पेण पोलीस यांच्या पथकाने खरबाची वाडी येथे छापा टाकून वरील पाच संशयित आरोपींना वन्य जीव संवरक्षक कायदा 1972 चे कलम 9,51,52 अन्वये अटक केली आहे.Conclusion:या पथकाला खरबाची वाडी येथे घटनास्थळी मृत अजगराची चरबीचे अवशेष तसेच रक्ताचे थेंब पडलेले आढळून आले असल्याची माहिती पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी दिली. या आरोपींना आज पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

* गुन्हा दाखल होताच सोशल मीडियावरील व्हिडिओ डिलीट *
वनाधिकारी यांनी गुन्हा दाखल करताच या तरुणांनी सोशल मीडियावर वरील हा व्हिडीओ काढून टाकला आहे. या व्हिडीओ मध्ये या तरुणांनी अजगराला मारुन त्याच्या शरीराचे तुकडे केलेले दिसत होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.