ETV Bharat / state

कोकणात 'मविआ'चे विधानसभेत 11 आमदार; समस्या सोडविणार का ? - mahavikas aaghadi kokan latest news

कोकणात 9 उमेदवार हे शिवसेनेचे आणि दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून गेले आहेत. कोकणात शिवसेनेची ताकद असूनही विकासाच्या दृष्टीने कोकणाला नेहमी झुकते माप मिळालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.

raigad
रायगड
author img

By

Published : Dec 5, 2019, 3:20 PM IST

रायगड - 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातून 15 आमदार विधानसभेत निवडून गेले. यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षांची आघाडी होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. या महाविकास आघाडीचे कोकणातून 11 आमदार निवडून आले आहेत. तर भाजपचे 3 आणि भाजपला पाठिंबा दिलेला 1 आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा महाविकास आघाडी राज्यात असूनही कोकणातील समस्या सुटल्या नाहीत तर विकास खुंटला जाणार आहे.

महाविकास आघाडी करणार कोकणात विकास ?

कोकणात 9 उमेदवार हे शिवसेनेचे आणि दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून गेले आहेत. कोकणात शिवसेनेची ताकद असूनही विकासाच्या दृष्टीने कोकणाला नेहमी झुकते माप मिळालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 10 वर्षांपासून रखडलेला आहे. महामार्ग हा कोकणच्या विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन हा महामार्ग लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

हेही वाचा - पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

महामार्ग खड्डेमय झाला असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. आरोग्य सेवा विस्कळीत झाली असल्याने अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या महामार्गावरील रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यात सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाची नितांत गरज आहे. अद्ययावत रुग्णालय नसल्याने जखमींना मुंबई, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात उपचारासाठी हलवावे लागत असते.

कोकणात भातशेती, मच्छीमारी, आंबा, काजू उत्पादन घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या आपत्तीने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. शासनाकडून मात्र, तुटपूजी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. तरीही कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत आमदारांनी विधानसभेत लक्ष वेधून प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कोकणातील शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पाणी, कोकण रेल्वे हे प्रश्नही अनेक वर्षे प्रलंबित आहेत. याकडेही लक्ष देऊन आमदारांनी समस्या सोडविणे गरजेचे आहे.

हेही वाचा - कर्नाटक पोटनिवडणूक : १५ जागांसाठी मतदान सुरू, सत्ताधारी भाजपची कसोटी

कोकणातील तिन्ही जिल्ह्यात विविध समस्या आहेत. म्हणून आताच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणातील आमदारांनी एकत्रित येऊन येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. तरच खुंटलेला कोकणचा विकास साधला जाईल.

Intro:महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणातील आमदार समस्या सोडविणार का ?

महाविकास आघाडीचे 11 आमदार विधानसभेत

शिवसेनेचे नऊ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार

रायगड : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या कोकण पट्यातून 15 आमदार विधानसभेत निवडून गेले आहेत. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होऊन सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे कोकणातून 11 आमदार निवडून आले आहेत. तर भाजपचे तीन आणि भाजपला पाठींबा दिलेला एक आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे महत्वाचे आहे. अन्यथा महाविकास आघाडी राज्यात असूनही कोकणातील समस्या सुटल्या नाहीत तर विकास खुंटला जाणार आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन होऊन राज्य स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. कोकणात 9 उमेदवार हे शिवसेनेचे आणि दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून गेले आहेत. कोकणात शिवसेनेची ताकद असूनही विकासाच्या दृष्टीने कोकणाला नेहमी झुकते माप मिळालेले आहे. त्यामुळे महा विकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.

Body:कोकणात जाणार मुंबई गोवा महामार्ग दहा वर्षांपासून रखडलेला आहे. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने याकडे लक्ष देऊन हा महामार्ग लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
महामार्ग खड्डेमय झाला असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असून आरोग्य सेवा विस्कळीत झाली असल्याने अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्ह्यात सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाची नितांत गरज आहे. अत्यावत रुग्णालय नसल्याने जखमींना मुंबई, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात उपचारासाठी हलवावे लागत असते.

कोकणात भातशेती, मच्छीमारी, आंबा, काजू उत्पादन घेतले जाते. मात्र निसर्गाच्या आपत्तीने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. शासनाकडून मात्र तुटपूजी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. तरीही कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही. शेतकऱ्याच्या या समस्येबाबत आमदारांनी विधानसभेत लक्ष वेधून प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कोकणातील शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पाणी, कोकण रेल्वे हे प्रश्नही अनेक वर्षे प्रलंबित आहेत. याकडे लक्ष देऊन आमदारांनी समस्या सोडविणे गरजेचे आहे.

कोकणातील तिन्ही जिल्ह्यात विविध समस्या आहेत. मात्र महा विकास आघाडीच्या माध्यमातून कोकणातील आमदारांनी एकत्रित येऊन येथील समस्या सोडविण्यात प्रयत्न करणे महत्वाचे आहे. तरच खुंटलेला कोकणचा विकास साधला जाईल.

------------------------------
Conclusion:कोकणातील महा विकास आघाडीचे आमदार

सिंधुदुर्ग
सावंतवाडी - दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण - वैभव नाईक, शिवसेना

रत्नागिरी
राजापूर - राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी - उदय सामंत, शिवसेना
चिपळूण - शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर - भास्कर जाधव शिवसेना
दापोली - योगेश कदम, शिवसेना

रायगड
महाड - भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन - अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग - महेंद्र दळवी, शिवसेना
कर्जत - महेंद्र थोरवे, शिवसेना

भाजप
प्रशांत ठाकूर (पनवेल), रवींद्र पाटील (पेण), नितेश राणे (देवगड), महेश बालदी (उरण) अपक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.