रायगड - लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. यावेळी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई, आ. भरत गोगावले, भाजपचे आ. प्रशांत ठाकूर, आ. प्रवीण दरेकर, आ. निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सकाळी अलिबागची ग्रामदेवता काळंबादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर अनंत गीते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनंत गीते यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कुरूळ येथील क्षात्रोक्य समाज हॉल येथे प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निघून गेले.