ETV Bharat / state

Irshalgad Landslide: इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत: उद्धव ठाकरे - रायगड इर्शाळवाडी भूस्खलन

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दरडग्रस्त इर्शाळवाडीला भेट दिली. उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीतील नागरिकांशी आणि पत्रकाराशी संवाद साधला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा पत्रकारांशी संवाद
उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत दाखल
author img

By

Published : Jul 22, 2023, 12:08 PM IST

Updated : Jul 22, 2023, 5:34 PM IST

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा पत्रकारांशी संवाद

रायगड : आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. तुमचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही हवी असलेली मदत करू.इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत,असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना धीर दिला.

पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत : इर्शाळवाडीत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंचायत मंदिरात दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. मी खालापूर येथे फक्त तोंड दाखवायला आलो नाही.तुमचे व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत असेन. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू.तुमच्या सर्वांचे पुनर्वसन व्यवस्थित जागी करू. तुम्हाला परत संकटाचा सामना करावा लागू,नये याची खबरदारी घेऊ,अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीतील नागरिकांना दिलासा दिला.यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते.स्थानिकांना धीर देताना उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या.

तहसीलदारांना सूचना : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत दाखल झाल्यानंतर स्थानिकांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या सांगितल्या. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह कसे सापडले, घटना कशी घडली,याची माहिती नागरिकांनी उद्धव ठाकरेंना दिली. दुर्घटनाग्रस्तांची समस्या ऐकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तहसीलदारांशी संवाद साधला आणि त्यांना सूचना केल्या.परिसरात 4 वाड्या आहेत,त्यासर्व एकत्र करा आणि सर्वांचे एकत्रितपणे पुनर्वसन करा.नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे पुनर्वसन करा. येथील लोकांना जास्त दिवस कंटेनरमध्ये राहावे लागणार नाही,याची काळजी घ्यावी,अशा सूचना त्यांनी तहसीलदारांना दिल्या.

आधीच पुनर्वसन झालं असतं तर... : इर्शाळवाडीतील स्थानिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत.अशा दुर्घटना कधीही होऊ शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही.दरम्यान हा अनुभव येण्याआधी पुनर्वसन झाले असते तर चांगले झाले असते. मी यात राजकारण करत नाही,पण ही राजकारण्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याचे ठाकरे म्हणाले.दरम्यान इर्शाळवाडीमधील नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत ते त्यांच्यापाठीशी असल्याची ग्वाही दिली.

हेही वाचा -

  1. Irshalwadi Landslide rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 22 वर, बचावकार्याला पुन्हा सुरुवात
  2. Chandepatti village: दरड कोसळण्याच्या भीतीने चांदेपट्टी गावातील नागरिकांचे स्थलांतर ...

Last Updated : Jul 22, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.