ETV Bharat / state

'केंद्राकडून रुपयाचीही मदत नसताना राज्य सरकारकडून रायगडला पाऊणे चारशे कोटींचे प‌ॅकेज'

कोरोनाचे महासंकट राज्यावर घोंघावत असताना रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. मात्र, राज्याची आर्थिक घडी बिघडलेली असतानाही आणि केंद्राकडून अद्याप एकही रुपया राज्याकडे आलेला नसताना देखील महाविकास आघाडी सरकार रायगडकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे, असे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Raigad District Guardian Minister Aditi Tatkare
रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे
author img

By

Published : Jun 19, 2020, 5:16 PM IST

रायगड - कोरोनाचे महासंकट राज्यावर घोंघावत असताना रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. मात्र, राज्याची आर्थिक घडी बिघडलेली असतानाही आणि केंद्राकडून अद्याप एकही रुपया राज्याकडे आलेला नसताना देखील महाविकास आघाडी सरकार रायगडकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडसाठी तातडीने 100 कोटी निधी मंजूर करून त्यातील 72 कोटी प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. त्यात आता कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत रायगडासाठी 301 कोटी वाढीव निधी मंजूर केला असून रायगडासाठी भरीव असा पावणेचारशे कोटी निधी नुकसानग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार रायगडच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असल्याचे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे यांची पत्रकार परिषद...

हेही वाचा... मराठी पाऊल पडते पुढे...! महेश भागवतांची तेलंगाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात पालकमंत्री अदिती तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी वरील माहिती दिली. खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे हेही यावेळी उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, पेण, रोहा, माणगाव, म्हसळा या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणचा रहिवासी, बागायतदार हा पूर्णतः कोलमडून गेला आहे. मात्र, असे असले तरी महाविकास आघाडी सरकारने रायगडवर आलेल्या या संकटकाळात मायेची ऊब दिली. पुन्हा रायगडातील नुकसानग्रस्तांना उभे करण्यासाठी खंबीरपणे पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने 100 कोटींची मदत जाहीर केली होती. यातील 72 कोटी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईचे वाटपही करण्यात सुरुवात झाल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले.

मंत्रालयात झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडासाठी 301 कोटींची भरीव वाढीव मदत त्वरित जाहीर केली आहे. त्यातील 242 कोटी 84 लाख रुपये निधी हा प्रथम प्रधान्यस्तर असलेल्या अंशतः पडझड झालेल्या तसेच पूर्ण नुकसान झालेल्या कच्चे, पक्के झोपडी, घराच्या नुकसानी भरपाईसाठी प्राप्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 2 लाख नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात लवकरात लवकर नुकसानीची रक्कम जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चक्रीवादळात मच्छीमारांची जाळी, बोटी यांचे झालेल्या नुकसानीबाबतही नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येणार असून पूर्वी जाळीचे नुकसान झाले असेल त्यावेळी अडीच हजार मिळत होते. तर आता ते वाढवून पाच हजार केले आहे. बोटीच्या नुकसानीचे पूर्वी 9 हजार मिळत होते ते आता 25 हजार शासन देत आहे. पूर्वी खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांना नुकसान भरपाई मिळत नव्हती. मात्र, शासनाने या खाजगी अनुदानित, विना अनुदानित शाळांनाही जिल्हा परिषद शाळांच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तटकरे यांनी दिली.

गणपती कारखानदार यांचेही वादळात नुकसान झाले असून त्यांनाही जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. छोटे व्यवसायिक यांच्या झालेल्या दुकानाच्या नुकसानीची भरपाईही शासनाकडून देण्यात येणार आहे. बागायतदार यांच्या नुकसानीबाबत वाढीव निधी आलेला नसला, तरी तोही वाढीव निधी राज्य शासन आणि केंद्राकडून येण्याची शक्यता आहे. पूर्वीची रोजगार हमी योजना लागू केली जाणार असून यामध्ये नारळ, सुपारी, कोकम या फळांचाही समावेश करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाने बाधित क्षेत्राला दत्तक घेऊन त्याठिकाणी तीन गावांना मिळून एक प्राध्यापक नेमण्याबाबत विचार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.