ETV Bharat / state

Raigad Blast : महाडमधील कंपनीत स्फोट, ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

महाड तालुक्याती एका कंपनीत शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात किमान ३ जण ठार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर इतर २जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Raigad Blast News
Raigad Blast News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 12:10 PM IST

Updated : Nov 4, 2023, 8:41 AM IST

कंपनीमधील स्फोटानं हादरला परिसर

रायगड (महाड)- महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात ३ जण ठार झाले तर २जण गंभीर जखमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काही कामगार कंपनीत अडकले होते. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. आज ४ तारखेला सकाळी ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

  • महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या के फोर/ एक या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत आगीचे लोण पसरल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
  • Maharashtra | Three bodies recovered from Blue Jet Healthcare at Mahad MIDC in Raigad district where an explosion occurred last night. NDRF team reached there last and is continuing the rescue operation.

    (Pics: NDRF) pic.twitter.com/6VdsEVPp5i

    — ANI (@ANI) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्फोटाच्या मालिकेमुळे अग्नीशमन दलाला अडथळे- गेल्या अर्ध्या तासापासून येथे सुरू असलेल्या आगीच्या व स्फोटाच्या व वायू गळतीच्या शक्यतेच्या कारणामुळे प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यात अग्निशमन दल मार्ग व संबंधित शासकीय यंत्रणांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आलं. यासंदर्भात प्राप्त झालेल्या स्थानिक वृत्तानुसार कारखान्यामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मोठ्या दुखापती होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत खुलासा हा संबंधित कारखाना अथवा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. आगीचे वृत्त समजताच महाड फायर स्टेशनच्या पथकासह शेजारील कारखान्यातील अग्निशमन बंब तसेच मार्गच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कारखान्यामध्ये सुरू असलेल्या स्फोटाच्या मालिकेनं प्रत्यक्ष घटनास्थळापर्यंत जाता येत नसल्याचेही दिसून येत आहे.

नुकतेच महाबळेश्वरमध्ये स्फोट- महाबळेश्वरमध्ये नुकतेच दुर्गादेवीच्या मिरवणुकीत जनरेटरच्या स्फोटात घडली. कराडमधील त्रिशंकू परिसर जबरदस्त स्फोटानं (Gas Cylinder Blast) हादरला. या घटनेत एकूण ९ जण जखमी (9 People Injured) झाले आहेत. कराड शहरातील त्रिशंकू परिसरातील मुजावर कॉलनीत सकाळी जबरदस्त स्फोटाने हादरली. शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या घराच्या भिंतीचा काही भाग सुमारे २५ फूटावर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडला. या घटनेत शरीफ मुल्ला यांच्या कुटुंबातील ९ जण जखमी झाले आहेत. शेजारील ७ घरांच्या भिंतींची मोठी पडझड झाली असून कॉलनीतील अनेक घरं धोकादायक बनली आहेत. घरांच्या पडझडीमुळे ६ दुचाकींचंही नुकसान झालं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा-

  1. Kerala Blast : केरळ बॉम्बस्फोटातील आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, केले अनेक खुलासे; जाणून घ्या का केले स्फोट?
  2. Cylinder Blast : सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे नागरी वस्तीत स्फोट; ९ जण जखमी, ७ घरांची पडझड... पाहा व्हिडिओ

Last Updated : Nov 4, 2023, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.