ETV Bharat / state

आरएसएस दहशतवादी संघटना; प्रकाश आंबेडकरांचा रायगडात हल्लाबोल - Congress

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थाने बहुजनांची आघाडी झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 27, 2019, 6:26 PM IST

रायगड - वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थाने बहुजनांची आघाडी झाली आहे. भांडवलाशिवाय निवडणूक लढविण्याचा प्रघात यामुळे पुढे आला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पक्षांना आपली भूमिका बदलावी लागेल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला.

प्रकाश आंबेडकर

खोपोली येथे वंचित बहुजन आघाडीचे मावळ मतदार संघाचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडी राज्यात किती जागा जिंकणार याबाबत प्रश्न विचारला असता, वंचित बहुजन आघाडी ही धनगर व भटक्या विमुक्त समाजाने केलेला एल्गार आहे. त्यानंतर यामध्ये आंबेडकरी फोर्स सामील झाली आणि नंतर एमआयएम हा पक्ष सामील झाला. ही आघाडी खऱ्या अर्थाने बहुजनांची आघाडी झाली आहे. यामध्ये आम्ही दोन जागा जिंकलो तरी आमचा विजय आहे. मतदारांकडून पैसे घेऊन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे भांडवलाशिवाय निवडणूक लढविण्याचा प्रभाव पुढे येत आहे. आगामी काळात राजकीय पक्षांना वंचित बहुजन आघाडीमुळे आपली भूमिका बदलावी लागणार आहे, असे उत्तर आंबेडकर यांनी दिले.

साध्वी प्रज्ञा सिंहने पोलिसांबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारले असता, शिवसेना या विषयावर काहीच बोलत नाही, याचे मला आश्चर्य वाटत आहे. शिवसेना शाखेमध्ये आजही शहीद झालेल्या पोलिसांचा शहीद दिवस साजरा केला जातो. साध्वी प्रज्ञा यांनी केलेले व्यक्तव्य गैर वाटत नाही, कारण साध्वी प्रज्ञा सिंह या आरएसएसबरोबर आहेत. आरएसएस ही टेरॅरिस्ट संघटना आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत 29 एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचे बोलले जाते, यावर राष्ट्रवादी काँग्रेस हीच बी टीम असल्याचे उत्तर देऊन आंबेडकर यांनी वेळ मारून नेली.

Intro:वंचित बहुजन आघाडीमुळे आगामी काळात राजकीय पक्ष आपली भूमिका बदलणार

आरएसएस दहशतवादी संघटना - प्रकाश आंबेडकर

रायगड : वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थाने बहुजनांची आघाडी झाली असून भांडवला शिवाय निवडणुक लढविण्याचा प्रभाव यामुळे पुढे आला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पक्षांना आपली भूमिका बदलावी लागेल. तर आरएसएस ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

खोपोली येथे वंचित बहुजन आघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार राजाराम पाटील यांची प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली.Body:खोपोली येथे वंचित बहुजन आघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार राजाराम पाटील यांची प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडी राज्यात किती जागा जिंकणार याबाबत प्रश्न विचारला असता, वंचित बहुजन आघाडी हि धनगर व भटक्या विमुक्त समाजाने केलेला एल्गार आहे. त्यानंतर यामध्ये आंबेडकरी फोर्स सामील झाली आणि नंतर एमआयएम हा पक्ष सामील झाला. त्यानंतर ही झालेली आघाडी खऱ्या अर्थाने बहुजनांची आघाडी झाली आहे. यामध्ये आम्ही दोन जागा जिंकलो तरी आमचा विजय आहे. मतदारांकडून पैसे घेऊन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे भांडवला शिवाय निवडणूक लढविण्याचा प्रभाव पुढे येत आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पक्षांना वंचित बहुजन आघाडीमुळे आपली भूमिका बदलावी लागणार आहे. असे उत्तर आंबेडकर यांनी दिले.Conclusion:साध्वी प्रज्ञा सिग हिने पोलिसांबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारले असता, शिवसेना या विषयावर काहीच बोलत नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. शिवसेना शाखेमध्ये आजही शहीद झालेल्या पोलिसांचा शहीद दिवस साजरा केला जातो. साध्वी प्रज्ञा यांनी केलेले व्यक्तव्य गैर वाटत नाही कारण साध्वी प्रज्ञा सिंग ह्या आरएसएस बरोबर आहेत. आणि आरएसएस ही टेरिरिस्ट संघटना आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत 29 एप्रिल पर्यत स्पष्ट करा असे प्रकाश आंबेडकर यांनी आव्हान केले आहे.

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचे बोलले जाते यावर राष्ट्रवादी काँग्रेस हीच बी टीम असल्याचे उत्तर देऊन आंबेडकर यांनी वेळ मारून नेली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.