ETV Bharat / state

कामोठे अपघात : 'त्या' बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात - स्कूल बस

अपघातानंतर या बेदरकार स्कोडा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्याने हा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय होता. अंगावर काटा आणणारे हे चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.

कामोठे अपघात : त्या बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Jul 23, 2019, 2:39 PM IST

Updated : Jul 23, 2019, 5:57 PM IST

पनवेल - कामोठे येथे भरधाव वेगातील कारने सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ वर्षांच्या एका मुलाचाही समावेश होता. याप्रकरणी बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कामोठे अपघात : 'त्या' बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

हरविंदरसिंग हरभजन मटारू (वय ७५ वर्षे) असे या बेदरकार स्कोडा चालकाचे नाव आहे. या अपघातात त्यालाही जखमा झाल्या असून सध्या तो पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात उपचार घेत आहे.
कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात घडला होता. भरधाव वेगातील एका स्कोडा कारने काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या चार दुचाकी, पादचारी आणि स्कूल बसला धडक दिली होती. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, साधना चोपडे (वय ३० वर्षे), श्रध्दा जाधव (वय ३१ वर्षे), शिफा (वय १६ वर्षे), आशिष पाटील (वय २२ वर्षे) आणि प्रशांत माने हे चार जण जखमी झाले होते.

अपघातानंतर या बेदरकार स्कोडा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्यानं हा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय होता. अंगावर काटा आणणारे हे चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. तातडीने पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता वाहन चालक उपचारासाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल झाला असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मोटारीची तपासणी केली असता मोटारीत कोणताही बिघाड नसल्याचे उघड झाले आहे. परंतु, चालकाने भरघाव वेगात गाडी का चालवली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Intro:सोबत फोटो आणि व्हिडीओ जोडला आहे.
पनवेल

कामोठे इथं भरधाव वेगातील कारनं सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. याप्रकरणी आता बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 75 वर्षीय हरविंदरसिंग हरभजन मटारु असे या बेदरकार स्कोडा चालकाचे नाव आहे. या अपघातात त्याला ही जखमा झाल्या असून सध्या तो पनवेलमधल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.Body:कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा भयंकर प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या एका स्कोडा कार काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या चार दुचाकी, पादचारी व स्कूल बसला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात सात वर्षीय मुलाचा देखील समावेेेेश आहे. तर, साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय १६), आशिष पाटील (२२) आणि प्रशांत माने हे चार जण जखमी झाले.

अपघातानंतर या बेदरकार स्कोडा चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्यानं हा 'ड्रंक अँड ड्राइव्ह'चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय होता. अंगावर काटा आणणारं हे चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. तातडीने पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता वाहन चालक उपचारासाठी पनवेल मधील एम जी एम रुग्णालयात दाखल झाला असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली.

Conclusion:सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मोटारीची तपासणी केली असता मोटारीत कोणताही बिघाड नसल्याचे उघड झाले आहे. परंतु, चालकाने भरघाव वेगात गाडी का चालवली? याचा तपास पोलीस करत आहेत.
Last Updated : Jul 23, 2019, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.