ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करणारा माथेफिरू पोलादपूर पोलिसांच्या ताब्यात - college student attacked with knife

महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून फरार झालेला माथेफिरूला पकडण्यात पोलादपूर पोलिसांना यश आले आहे.

आरोपी शुभम वनारसे
author img

By

Published : Aug 30, 2019, 9:10 AM IST

Updated : Aug 30, 2019, 9:25 AM IST

रायगड - महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून फरार झालेल्या माथेफिरूला पकडण्यात पोलादपूर पोलिसांना यश आले आहे. खेडकडच्या दिशेने दुचाकीवर जात असताना आरोपीला सापळा रचून जेरबंद करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीला ट्रामा केअरमधून मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करणारा माथेफिरू पोलादपूर पोलिसांच्या ताब्यात

हेहा वाचा - पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून; स्वतःही घेतला गळफास, 'हे' आहे कारण

आरोपी शुभम वनारसेने समर्थ नगर येथे दबा धरून निर्जन रस्त्यावरून येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. आरोपी पीडितेच्या तोंडात ओढणी कोंबून तेथून पसार झाला होता. ही घटना मंगळवारी २७ ऑगस्टला पोलादपूर सावंतकोंड समर्थनगर येथे घडली होती. तसेच गेल्या ३ दिवसांपासून पोलादपूर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

हेहा वाचा -कृत्रिम साधनाने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पती विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

आरोपी शुभम हा मुंबई गोवा महामार्गाने खेडकडे जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून पोलिसांना लागली होती. त्यानुसार माणगाव ते खेड यादरम्यान पोलिसांनी सापळा रचला होता. माणगाव येथून आरोपी खेडकडे जात असल्याचे पोलिसांना समजल्यावर पाठलाग केला व शिवाजी महाराज पुतळा येथे आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपी शुभमला पोलिसांनी अटक केले असून गुरुवारी महाड येथे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Intro:पोलादपूर प्रकरणातील चाकूहल्ला करणारा आरोपी जेरबंद

फिल्मी स्टाईल पाठलाग करून शुभमच्या आवळल्या नाड्या

रायगड : मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी पोलादपूर सावंतकोंड समर्थनगर येथे महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीवर चाकूहल्ला करून फरार झालेला माथेफिरू तरुण शुभम वनारसे याला पकडण्यात पोलादपूर पोलीसांना यश आले आहे. खेड कडे मोटार सायकलवर जात असता शुभम याला पोलादपूर येथे सापळा रचून अटक करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीला ट्रामा केअरमधून मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
Body:शुभम वनारसे याने समर्थ नगर येथे दबा धरून निर्जन रस्त्यावरून येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. शुभम याने जखमी मुलीच्या तोंडात ओढणी कोंबून तेथून पसार झाला होता. पोलादपूर पोलीस आरोपी शुभम याचा शोध घेत होते. Conclusion:आरोपी शुभम हा मुंबई गोवा महामार्गाने खेड कडे जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून पोलिसांना लागली होती. त्यानुसार माणगाव ते खेड दरम्यान पोलिसांनी सापळा रचला होता. माणगाव येथून आरोपी खेडकडे जात असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्याचा सिनेमा पद्धतीने पाठलाग केला आणि पोलादपूर येथे शिवाजी महाराज पुतळा येथे शुभमला पकडण्यात यश आले. आरोपी शुभमला पोलिसांनी अटक केले असून गुरुवारी महाड येथे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Last Updated : Aug 30, 2019, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.