ETV Bharat / state

बिल्डर माफियांना माफी नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा

author img

By

Published : Oct 17, 2019, 11:30 AM IST

डोंबिवली, ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेणच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी काही निवडक मुद्द्यांवरच भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पनवेल - शेती आणि बांधकाम व्यवसायात गरिबांना लुटणाऱ्या माफियांना माफी नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळेबाजांना दिला आहे. 2014 पूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफियांची लूटमार मोठ्या प्रमाणात होत होती. त्या सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले. त्याचे पडलेले डाग आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धुऊन काढता आले नाहीत, अशी टीकाही मोदी यांनी यावेळी केली. ते खारघरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

डोंबिवली, ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेणच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी काही निवडक मुद्द्यांवरच भाष्य केले. यावेळी मासेमारी करणाऱ्यांसाठी नव्या योजना सुरू करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींचा 'जबरा फॅन' : म्हणतो, ते माझे राम मी त्यांचा हनुमान !

तसेच पनवेलजवळ तयार होणाऱ्या 2 लाख घरांचे झोपडपट्टीधारकांना वाटप केले जाणार, असल्याचे मोदींनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि गरीबांच्या घराची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या माफियांना संपवण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षात झाला आणि पुढे तो हाईल, असेही मोदींनी सांगितले. तर शेतकऱ्यांच्या मागे सतत प्रामाणिकपणे ठाम उभे राहून विकास साधणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणा, असे आवाहनही यावेळी मोदींनी केले.

हेही वाचा - विद्युत तार पडून शेतात काम करणारे दोघे ठार

मी नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाला आलो होतो. आता लवकरच नवी मुंबई विमानतळावरून विमान उडण्यास सुरूवात होईल, असे मोदींनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक व रविंद्र पाटील हे उपस्थित होते.

Intro:सोबत भाषण जोडले आहे

पनवेल

शेती आणि रियल इस्टेट क्षेत्रात गरिबांना लुटणाऱ्या माफियांना माफी नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाजांना टार्गेट केलंय. २०१४ पूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रात अंडरवर्ल्ड आणि बिल्डर माफियांची लूटमार मोठ्या प्रमाणात होती. अनेक घोटाळे ही त्या सरकारच्या काळात झाले. त्याचे पडलेले डाग आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धुऊन काढता आलेले नाहीत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. आज खारघरमध्ये पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी ही टीका केली.

Body:विधानसभा निवडणुकीत डोंबिवली, ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेणच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा आयोजित करण्यात आली होती. सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी काही निवडक मुद्द्यांवरच भाष्य केलं. यात मासे माऱ्यांसाठी नव्या योजना, मासेमाऱ्यांचे पैसे थेट बँकेत जमा व्हावेत यासाठी प्रयत्न, तसेच त्यांच्या बोटी आधुनिक करण्यासाठी योजना सुरू असल्याचेही देखील मोदींनी सांगितले. परंतु सध्या पनवेल आणि रायगडमध्ये कर्नाळा बँकेतून ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने संतापाचं वातावरण असतानाच मोदींनी मासेमाऱ्यांचे पैसे थेट बँकेत ठेवण्यासाठी केलेलं आश्वासन कितपत पनवेलकर आणि रायगडकरांना पचनी पडला असेल याबाबत शंका आहे.

गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पनवेलजवळ तयार होणारी दोन लाख घरांचे झोपडपट्टीधारकांना वाटप केले जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि गरीबांच्या घराची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या लँड माफियांना संपवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात झाला आणि पुढे ही असणार असंही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मागे सतत प्रामाणिकपणे ठाम उभं राहून विकास साधणाऱ्या भाजप सरकारला जिंकून आणा, असं आवाहन ही यावेळी नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
Conclusion:भाषणाच्या शेवटला नरेंद्र मोदी यांनी बोलताना नवी मुंबई विमानतळाचा मुद्दा काढायला विसरले नाहीत. यावर बोलताना ते म्हणाले, या आधीही मी नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाला आलो होतो, आता लवकरच नवी मुंबई विमानतळावरून विमान उडण्यास सुरूवात होईल, असं बोलून नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा थोडक्यात आवरला.

नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर भाजपचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक व रविंद्र पाटील हे देखील उपस्थित होते. पेण, पनवेल, बेलापूर, ऐरोली आणि डोंबिवली ही शहर नवे उर्जास्थाने होणार आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.