ETV Bharat / state

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना रायगडकरांनी दिला मदतीचा हात

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी राज्याच्या विविध भागांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातूनही पूरग्रस्त भागात मदत पोहचवण्यासाठी नागरिकांसह सामाजिक संस्था, प्रशासन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

रायगडकरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
author img

By

Published : Aug 10, 2019, 9:23 PM IST

रायगड - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये पुराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबं निराधार झाली असून, घरातील जीवनावश्यक वस्तूही पुरात वाहून गेल्या आहेत. पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातूनही पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी नागरिकांसह सामाजिक संस्था, प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.

रायगडकरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
गेला आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली. पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने, हजारो नागरिक पाण्यात अडकले. प्रशासन, स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, भारतीय सैन्य, कोस्टल गार्ड, सामाजिक संस्था यांनी पुरात अडकलेल्यांना बाहेर काढले.खाण्यासाठी अन्न नाही, घालण्यासाठी कपडे नाहीत अशी, परिस्थिती सगळीकडे सध्या निर्माण झाली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून पूरभागात खाद्यपदार्थ, पाणी, कपडे याची मदत पाठवण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. जास्तीत-जास्त लोकांनी मदत करावी असे, आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात आले आहे.

Intro:
रायगडातून पूरग्रस्तांना मदतीचा हात

प्रशासन, सामाजिक संस्था मदतीसाठी आल्या पुढे

रायगड : रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्रमध्ये पुराने थैमान घातले आहे. अनेक कुटूंब ही निराधार झाली असून घरातील जीवनावश्यक वस्तूही पुरात वाहून गेल्या आहेत. पूर ओसरायला सुरुवात झाली असून आता पुरभागात मदतीसाठी ओघ सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातूनही पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यासाठी नागरिकांसह सामाजिक संस्था, प्रशासन यांनी हात पुढे केला आहे.Body:आठवडाभर मुसळधार पाऊस राज्यात पडत होता. त्यामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली. धरण तुडूंब वाहू लागले. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी, नदीचे पाणी, धरणातील वाढलेले पाणी यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पसरले होते. पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांच्या घरात पाणी साचले. हजारो नागरिक पाण्यात अडकले. आपला जीव वाचविण्यासाठी मदतीची याचना करू लागले. प्रशासन, स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, भारतीय सैन्य, कोस्टल गार्ड, सामाजिक संस्था यांनी पुरात अडकलेल्याना बाहेर काढले.

पुरात संसार उध्वस्त झाले, घरातील खाण्यापिण्याचे साहित्य वाहून गेले. त्यामुळे अनेक भागात अन्नान दशा निर्माण झाली. अनेक कुटूंब बेघर झाली. खाण्यास अन्न नाही, घालण्यास कपडे नाही अशी परिस्थिती सगळीकडे दिसू लागली. या परिस्थितीत आता पुरभागात मदतीचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली आहे.Conclusion:रायगड जिल्हा प्रशासनाकडून पुरभागात, बिस्कीट, पाणी, कपडे याची मदत पाठविण्यात आलेली आहे. तर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. पुरभागात पाठविण्यासाठी अन्न, बिस्किटे, पाणी, कपडे याची मदत करण्याचे आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.