ETV Bharat / state

Pen Police Station sudden death: बिल्डरच्या चुकीमुळे इमारतीच्या लिफ्ट मधून पडून महिलेचा जागीच मृत्यू - इमारतीच्या लिफ्ट मधून पडून संगीता केलसकर महिलेचा मृत्यू

पेण येथे इमारतीच्या लिफ्ट मधून पडून संगीता केलसकर (Sangita Kelaskar was died) या महिलेचा मृत्यू होण्याची घटना पेण शहरातील रामवाडी (Ramwadi in Pen city) येथे रविवारी घडली. बिल्डरकडे वारंवार केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने महिलेचा नाहक जीव गेल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. या प्रकरणी पेण पोलीस (Pen Police Station sudden death) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Royal Guardial Building at Ramwadi
रामवाडी येथील रॉयल गार्डीअल इमारत
author img

By

Published : Jul 18, 2022, 1:16 PM IST

रायगड: पेण येथे इमारतीच्या लिफ्ट मधून पडून संगीता केलसकर (Sangita Kelaskar was died) या महिलेचा मृत्यू होण्याची घटना पेण शहरातील रामवाडी (Ramwadi in Pen city) येथे रविवारी ( ता.17) घडली. बिल्डरकडे वारंवार केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने महिलेचा नाहक जीव गेल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. या प्रकरणी पेण पोलीस (Pen Police Station sudden death) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

रामवाडी येथील 'रॉयल गार्डीअल' या इमारती मधील भाडेकरू म्हणून राहणाऱ्या संगीता संदीप केळसकर ( वय 49) या इमारती मधील लिफ्टने खाली येत होत्या. सदर लिफ्ट पाचव्या मजल्याच्या दरम्यान आली असता अचानक बंद पडली. यावेळी संगीता केळसकर यांनी लिफ्ट मधील सुरक्षा अलार्म दाबल्याने खाली असलेला सुरक्षारक्षक धावत आला. त्याने चावीचा वापर करून लिफ्टचा दरवाजा उघडून संगीता यांना पाचव्या मजल्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उतरत असतांनाच संगीता यांचा तोल जाऊन लिफ्टच्या होळात खाली पडून, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करीत आहेत.

सदर 'रॉयल गार्डीअल' इमारतीचे मालक पटेल यांच्या कडे वारंवार अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्याने नाहक महिलेचा जीव गेल्याचा आरोप इमारती मधील रहिवाश्यांनी केला आहे.

हेही वाचा:Amravati accident : अमरावतीत कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.