पेण (रायगड) - 'ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करणारी कोकणातील 'क' वर्गातील पेण नगरपालिका पहिलीच असेल,' असे व्यक्तव्य रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पेण येथे प्रकल्प उद्घाटनप्रसंगी केले. पेण येथे ओल्या कचऱ्यावर प्रोसेसिंग करणाऱ्या प्रकल्पाचे उद्धाटन निधी चौधरी यांचे हस्ते नुकतेच झाले.
पेण नगरपरिषदेच्या कचरा वाहतुकीचा खर्च कमी करणारा तसेच प्रकिया करणारा हा प्रकल्प होणे नगरपरिषदेसाठी महत्त्वाचा होता, असे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले. ह्या कचरा प्रकल्पापासून हायवा कंपनीकडून एक कोटींचा सीएसआर निधी नगरपरिषदेला मिळाला आहेच. शिवाय, नगरपरिषदेच्या खर्चही कमी होणार आहे. यासाठी कंपनीचे आभार मानत असल्याचे पेणचे आमदार रवी पाटील यांनी येथे सांगितले.
हेही वाचा - कृषी विधेयक केंद्रात मंजूर झाल्याने तीन दिवस पंजाब बंदची हाक, रेल्वे रद्द आणि मार्ग बदलले
'मुंबईऐवजी पेणची निवड घनकचरा प्रकल्पासाठी केली याबद्दल हायवा कंपनीचे आभार', जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या. 'स्वच्छ शहरासाठी पेण नगरपरिषद करीत असलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत. हा प्रकल्प इतर नगरपरिषदासाठी एक उदाहरण म्हणून दाखवता येईल', असेही त्यांनी पुढे म्हटले.
भाजपचे आमदार रविशेठ पाटील, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्यधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती निवृत्ती पाटील, राजा म्हात्रे, प्रकल्पनिर्मित करणाऱ्या हायवा कंपनीचे सुदेश धाबेकर, मिलिंद म्हात्रे, मोहन घाडगे, आदी उपस्थित होते. कचरा प्रकल्पाविषयी आरोग्य अधिकारी अंकिता ईचड यांनी प्रास्ताविक केले.
हेही वाचा - हरियाणात देशातील पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी..प्रति लिटर 7 हजार रुपयांचा भाव