ETV Bharat / state

मतदान जागर मंचच्यावतीने मतदान जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन - रायगड

मतदार जागर मंचाच्‍यावतीने जो श्रमिक जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्‍यात आला आहे. त्‍यानुसार अंमलबजावणी करण्‍याचे आश्‍वासन या उमेदवारांनी यावेळी दिले. नागरिकांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना उत्तरेही उमेदवारांनी दिली. जागर मंचाच्या उल्का महाजन यावेळी उपस्थित होत्या

मतदान जागर मंचच्यावतीने मतदान जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन
author img

By

Published : Apr 17, 2019, 12:05 PM IST

रायगड - जिल्‍ह्यातील विविध सामाजिक संस्‍थांनी एकत्र येऊन मतदार जागर जनमंच स्‍थापन केला आहे. त्‍याच्‍या वतीने मंगळवारी कोलाड येथे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना आपली भूमिका मांडण्‍यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे व वंचित बहुजन आघाडीच्‍या उमेदवार सुमन कोळी यांनी उपस्थित राहून आपली व आपल्‍या पक्षाची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी गैरहजेरी लावली होती.

मतदान जागर मंचच्यावतीने मतदान जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन

मतदार जागर मंचाच्‍यावतीने जो श्रमिक जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्‍यात आला आहे. त्‍यानुसार अंमलबजावणी करण्‍याचे आश्‍वासन या उमेदवारांनी यावेळी दिले. नागरिकांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना उत्तरेही उमेदवारांनी दिली. जागर मंचाच्या उल्का महाजन यावेळी उपस्थित होत्या.

श्रमिक जनतेचा जाहीरनामा राज्यातील विविध संघटनानी तयार केला आहे. श्रमिकांबाबत कोणतेही धोरण राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात नाही. त्यामुळे श्रमिकांचे प्रश्न अधांतरीत राहतात. त्याचबरोबर लोकशाहीमध्ये मतदारांनी मतदान करावे यासाठी जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे निमंत्रक उल्का महाजन यांनी सांगितले.

या निवडणुकीत मतदारांना कुठलेही आमिष किंवा पैशाचा वापर करणार नसल्‍याची शपथही या उमेदवारांनी घेतली. शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते व इतर उमेदवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाला वंचित घटकातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Intro:मतदार जागर मंचातर्फे जनजागृती, उमेदवारांनी मांडली आपली भूमिका

रायगड : रायगड जिल्‍हयातील विविध सामाजिक संस्‍थांनी एकत्र येवून मतदार जागर जनमंच स्‍थापन केला आहे. त्‍याच्‍या वतीने मंगळवारी कोलाड येथे लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांना आपली भूमिका मांडण्‍यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे व वंचित बहुजन आघाडीच्‍या उमेदवार सुमन कोळी यांनी उपस्थित राहून आपली व आपल्‍या पक्षाची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी गैरहजेरी लावली होती.Body:मतदार जागर मंचाच्‍या वतीने जो श्रमिक जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्‍यात आला आहे त्‍यानुसार अंमल बजावणी करण्‍याचे आश्‍वासन या उमेदवारांनी यावेळी दिले. नागरीकांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना उत्‍तरेही उमेदवारांनी दिली. जागर मंचाच्या उल्का महाजन यावेळी उपस्थित होत्या.

श्रमिक जनतेचा जाहीर नामा राज्यातील विविध संघटनेने तयार केला आहे. श्रमिका बाबत कोणतेही धोरण हे राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात नाही आहे. त्यामुळे श्रमिकांचे प्रश्न हे अधांतरीत राहतात. त्याचबरोबर लोकशाहीमध्ये मतदारांनी मतदान करावे यासाठी जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे निमंत्रक उल्का महाजन यांनी सांगितलेConclusion:या निवडणूकीत मतदारांना कुठलेही आमिष किंवा पैशाचा वापर करणार नसल्‍याची शपथही या उमेदवारांनी घेतली. शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते व इतर उमेदवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाला वंचित घटकातील शेकडो नागरीक उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.