ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळाचा बळी; उरणमध्ये भिंत अंगावर कोसळून महिला ठार

चक्रीवादळामुळे रायगडच्या उरणमध्ये घराची भिंत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नीता रमेश नाईक अवेदा असे मृत महिलेचे नाव आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी दोन लोक जखमीही झाले आहेत. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे 8399 घरांचे नुकसान झाले आहे.

उरणमध्ये भिंत अंगावर कोसळून महिला ठार
उरणमध्ये भिंत अंगावर कोसळून महिला ठार
author img

By

Published : May 17, 2021, 1:40 PM IST

रायगड - तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार प्रभाव हा पाहायला मिळत आहे. रात्री दोन वाजल्यापासून जिल्ह्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या वादळात उरण बाजारपेठेत भिंत कोळसून एक महिला जागीच ठार झाली आहे. नीता रमेश नाईक अवेडा असे मृत महिलेचे नाव आहे. जिल्ह्यात अजून दोन जण जखमी झाले असून एका जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वादळाचा जिल्ह्यात प्रभाव
तोक्ती चक्रीवादळ हे रात्री अडीच वाजल्यापासून रायगडच्या किनारपट्टीवर धडकले आहे. त्यानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. ताशी 70 ते 80 वेगाने हे वारे वाहत असून वादळ मुंबईकडे सरकले असले तरी त्याचा प्रभाव अजूनही रायगडात सुरू आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात झाडे कोसळून पडली आहेत. तसेच 8399 घराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सखल भागात पाणीही साचले आहे.

भिंत कोसळून महिला ठार
जिल्ह्यात वादळी वारे जोरदार वाहत असून यामुळे उरण शहरातील एका इमारतीची भिंत कोसळली. या भिंतीच्या बाजूला भाजी विक्री करणाऱ्या महिला बसल्या होत्या. अचानक भिंत कोसळ्यामुळे भिंतीखाली दबून अवेडा गावच्या पन्नास वर्षीय नीता नाईक याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन महिला जखमी झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने त्वरित घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.