रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वर आज सकाळी दोन अपघात झाले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. पहिल्या अपघातात अमृतांजन ब्रिजच्या जवळ मुंबई लेनवर ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अपघातातील गाडी आयआरबी क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून घेण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या अपघातात एका ट्रेलरने उभ्या असलेल्या टेंम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. एक्सप्रेस वे-वरून ट्रेलर मुंबईहून पुण्याकडे जात असताना त्याचे ब्रेक फेल झाल्याने समोर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली, तर यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तरुणाचे शोलेस्टाईल आंदोलन, मोबाईल टॉवरवर चढून केली मागणी