ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ बस व टँकरचा अपघात; 1 ठार, 1 जखमी

अपघात हा मुंबई गोवा महामार्गाच्या मध्येच झाल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच आज लग्न मुहूर्त असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला पाच किलोमीटरपर्यत रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी दोन तासापासून वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

author img

By

Published : May 7, 2019, 9:07 PM IST

रायगड

रायगड - मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ बस आणि टँकर यांची समोरासमोरा धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. अपघातामधील जखमीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर वाहतूक पोलीस व माणगाव पोलीस अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळील कळमजे फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बस व टँकर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो ट्रॅव्हलरमधील एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ ट्रॅव्हलर बस व टँकरचा अपघात

1 ठार, 1 जखमी

पाच किलोमीटर पर्यत वाहतूक कोंडी

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि टँकर यांची समोर समोरा धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. अपघातामधील जखमीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. तर वाहतूक पोलीस व माणगाव पोलीस अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. Body:मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळील कळमजे फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बस व टँकर यांची समोरा समोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो ट्रॅव्हलरमधील एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. जखमी झालेल्या व्यक्तीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Conclusion:ट्रॅव्हलर बस व टँकर अपघात हा मुंबई गोवा महामार्गावर मधोमध झाल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प झाली. त्यातच आज लग्न मुहूर्त असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला पाच किलोमीटर पर्यत रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक दोन तासापासून वाहतुक कोंडीत अडकले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.