ETV Bharat / state

राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता आणखी हायटेक - राज्य परिवहन महामंडळाच्या बस

एसटी बसमध्ये व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) आणि पीआयएस( पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, बस नक्की कुठे आहे, किती वाजता येणार, त्यामधील चालक, वाहक आणि बसचा नंबर, ही सर्व माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे. एसटी बसही हायटेक होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. अलिबाग आणि महाड आगारामध्ये या सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्या आहेत.

bus
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 6, 2020, 8:35 PM IST

रायगड - रेल्वे, विमान, कॅब या माध्यमांमध्ये प्रवासी वाहतूक सेवेबाबत आपले वाहन किती वाजता ईच्छित स्थळी पोहोचणार याची अद्ययावत माहिती प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे मिळते. मात्र, आता ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसमध्येही व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) आणि पीआयएस( पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता आणखी हायटेक

यामुळे बस नक्की कुठे आहे, किती वाजता येणार, त्यामधील चालक, वाहक आणि बसचा नंबर, ही सर्व माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे. एसटी बसही हायटेक होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. अलिबाग आणि महाड आगारामध्ये या सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्या आहेत. इतर सहा आगारांमध्येही ही प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बससाठी ताटकळत बसण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा - एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुखकारक, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा देण्यासाठी शिवनेरीसारख्या गाड्या सेवेत आणल्या आहेत. एसटी बसला अजून आधुनिक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही प्रणाली पूर्णत्वास येण्यास दोन महिने लागणार असून मोबाईल अॅप्लिकेशन सुरू होण्यास सहा महिने लागणार असल्याची माहिती, व्हिटीएस सिस्टमचे प्रमुख राहुल घरत यांनी दिली आहे.

Intro:राज्य परिवहन बस झाली अजून हायटेक

व्हिटीएस आणि पीआएएस ट्रेकिंग सिस्टमने प्रवाशांना मिळणार बसची माहिती मिळणार एका क्लिकवर

ट्रेकिंग सिस्टमने प्रवाशांना आता ताटकळत बसावे लागणार नाही

जिल्ह्यात अलिबाग आणि महाड आगारात प्रायोगिक तत्वावर यंत्रणा सुरू

रायगड : रेल्वे, विमान, कॅब या प्रवासी वाहतूक सेवेबाबत प्रवाशांना आपले वाहन किती वाजता घटनास्थळी येणार याची अद्यावत माहिती प्रवाशांना मोबाईल ऍपने मिळत असते. मात्र ही सुविधा ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळत नव्हती. मात्र आता एसटी बसमध्येही व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) आणि पीआयएस ( पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम) बसवली असल्याने बस नक्की कुठे आहे आणि किती वाजता येणार, त्यामध्ये चालक, वाहक, बसचा नंबर ही अद्यावत माहिती मोबाईल ऍप द्वारे एका क्लिकवर प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे एसटी बसही आता हायटेक झाली असल्याने प्रवाशाचा वेळ ही वाचणार आहे. अलिबाग आणि महाड आगारामधून या सिस्टमची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू झाली असून इतर सहा आगारामधूनही ही सिस्टम एसटी बसला लवकरच बसविण्यात येणार आहे.

एसटी बस ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागातून शहरात तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी आजही ग्रामीण भागातील तसेच शहरातील प्रवासी एसटी बसचा प्रवास करीत आहेत. मात्र एसटी बस आगारातून सुटल्यानंतर पुढील स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बस नक्की किती वाजता येणार यासाठी ताटकळत बसावे लागत असते. एसटी आगारात फोन केल्यास अनेक वेळा फोन बंद असणे किंवा वाहतूक कोंडीत बस अडकली असेल तर त्याची माहिती प्रवाशांना मिळणे त्रासदायक ठरते. त्यामुळे प्रवाशी हा ताटकळत बसची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते.

Body:राज्य परिवहन महामंडळाने लाल डब्याचे नव्या रुपात रूपांतर केले असून प्रवाशांना सुखकारक, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवास करण्यासाठी शिवनेरीसारख्या बस सेवेत आणल्या आहेत. एसटी बसला अजून आधुनिकीरण व अद्यावत करण्यासाठी नवीन पावले उचलली आहेत. एसटी बस आगारातून निघाल्यानंतर ती कुठे आहे, पुढच्या ठिकाणावर किती वाजता पोहचेल, बसचा नंबर, चालक, वाहकाचे नाव याची इंतभूत माहिती प्रवाशांना आता एका क्लिकवर कळणार आहे. यासाठी सर्व एसटी बसमध्ये रोज मार्ट कंपनीचे ट्रॅकिंग यंत्र चालक केबिनमध्ये बसविले आहे. या ट्रेकिंग सिस्टमच्या सहाय्याने बसची नक्की माहिती परिवहन अधिकारी तसेच प्रवाशांना कळणार आहे. यासाठी एसटी आगारात या यंत्रणेचे सर्व्हर बसविण्यात आलेले आहे.

व्हिटीएस आणि पीआयएस सिस्टममुळे प्रवाशांचा आपल्या ठिकाणावर ताटकळत बसण्याचा वेळ वाचणार आहे. तसेच परिवहन अधिकाऱ्यांना चालक बस नियमात चालवीत आहे की नाही तसेच एसटी बस रस्त्यात कुठे बंद पडल्यास त्याची माहितीही सिस्टमद्वारे कळणार आहे. एसटी बस ही नव्या रुपात प्रवाशांना प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने आधीच पावले उचलली असताना आता ती ट्रेकिंग सिस्टममुळे हायटेकही झाली आहे.Conclusion:व्हिटीएस आणि पीआएएस ही सिस्टम बस मध्ये बसविण्यात आली असून बाहेरच्या ठिकाणी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बस किती वाजता येणार, बसचा नंबर, चालक, वाहक यांचे नाव मोबाईल ऍपच्या माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे त्याच्या वेळेची बचतही होण्यास मदत मिळणार आहे.

युवराज कदम, आगार प्रमुख, अलिबाग

---------------

व्हिटीएस आणि पीआयएस सिस्टम ही प्रवाशाच्या गरजेची आहे. या सिस्टममुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. प्रायोगिक तत्ववार ही सिस्टम अलिबाग, महाड आगारात सुरू करण्यात आलेली आहे. ही सिस्टम पूर्णत्वास येण्यास दोन महिने लागणार असून मोबाईल अप्लिकेशनवर सुरू होण्यास सहा महिने लागणार आहेत. याबाबत मुंबई येथे काम सुरू आहे.

राहुल घरत, व्हिटीएस सिस्टम हेड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.