ETV Bharat / state

किल्ल्यांवर येणाऱ्या मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई इशारा - रायगड किल्ला

रायगड जिल्ह्यात रायगड, कुलाबा, पद्मदुर्ग, खांदेरी, उंदेरी, सरसगड, सुधागड, तळागड यासारखे ऐतिहासिक गड आहेत. या गडांवर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, काही वेळा पर्यटक अनुचित प्रकार करतात.

गड
गड
author img

By

Published : Dec 29, 2019, 8:14 PM IST

रायगड - जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर नवीन वर्षाच्या स्वागताला पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. काही अतिउत्साही पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या प्रेक्षणीय स्थळावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालतात. अशा मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवभक्तांनी दिला आहे. आनंद साजरा करताना रायगडाचे पावित्र्य राखण्याचे आवाहनही शिवभक्तांनी पर्यटकांना केले आहे.

किल्ल्यावर येणाऱ्या मद्यपी पर्यटकांना इशारा

रायगड जिल्ह्यात रायगड, कुलाबा, पद्मदुर्ग, खांदेरी, उंदेरी, सरसगड, सुधागड, तळा गड यासारखे ऐतिहासिक गड आहेत. या गडांवर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, काही वेळा पर्यटक अनुचित प्रकार करतात. अलिबाग समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्यावर काही दिवसापूर्वी दोन गटात मद्यप्राशन करून हाणामारी झाल्याची घटना ताजी आहे. रायगडावरही काही पर्यटक मद्यप्राशन करून किल्यावर आले होते. त्यांना शिवभक्तांनी चोप दिला होता.

हेही वाचा - संतापजनक! सहलीदरम्यान मद्यधुंद शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन

गड, किल्ले हे आपला ऐतिहासिक वारसा असून पुढच्या पिढीने तो वारसा जपणे गरजेचे आहे. पर्यटकांनी किल्ल्यांवर आनंद लुटावा मात्र, सोबतच त्याचे पावित्र्यही राखावे. नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान जर कोणी पर्यटक मद्यप्राशन करून गडावर आढळले तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मावळा प्रतिष्ठानने दिला आहे.

Intro:गड, किल्यावर मद्यप्राशन कराल, तर शिवभक्तांच्या हाताचा प्रसाद खावा लागेल

नववर्षाच्या स्वागताला गड, किल्यावर येणाऱ्या मद्यपी पर्यटकांना इशारा

गड, किल्याचे पावित्र्य राखण्याचे शिवभक्तांचे आवाहन

गड, किल्याचा इतिहास जतन करा

रायगड : रायगड जिल्ह्यातील असलेल्या ऐतिहासिक गड, किल्यावर नवं वर्षाच्या स्वागताला पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र काही अतिउत्साही पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक वारसा असलेल्या प्रेक्षणीय स्थळावर मद्यप्राशन करून पर्यटक धिंगाणा घालण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. अशा मद्यपी पर्यटकांना शिवभक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य राखण्याचे आवाहन शिवभक्तांनी नववर्ष स्वागतनिमित्त केले आहे. त्यामुळे गड, किल्यावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना शिवभक्तांच्या हाताचा प्रसाद खावा लागणार आहे.

.

Body:रायगड जिल्ह्याला निसर्ग सौन्दर्या सह ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी ही रायगड किल्ला असून कुलाबा, पद्मदुर्ग, खांदेरी, उंदेरी, सरसगड, सुधागड, तळा गड यासारखे ऐतिहासिक गड, किल्ले आजही आपला ऐतिहासिक वारसा जतन करून आहेत. जिल्ह्यातील या गड, किल्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

अलिबाग समुद्रात असलेल्या खांदेरी किल्यावर काही दिवसापूर्वी दोन गटात मद्यप्राशन करून हाणामारी झाल्याची घटना ताजी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्यावरही काही पर्यटक मद्यप्राशन करून किल्यावर आले होते. त्यांना शिवभक्तांनी येथेच्छ माराचा प्रसाद दिला होता. गड, किल्यावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर कायम स्वरूपी आळा बसणे गरजेचे आहेConclusion:नववर्ष स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने रायगडात दाखल झाले आहेत. येणारे पर्यटक हे समुदाचा आनंद घेताना गड, किल्यावरही जात आहेत. मात्र यातील काही उत्साही पर्यटक गड, किल्याचे पावित्र्य न राखता मद्यप्राशन करून धिंगाणा घालण्याचा प्रकार करीत असतात. गड, किल्ले हा आपला ऐतिहासिक वारसा असून पुढच्या पिढीने तो वारसा जपणे गरजेचे आहे. पर्यटकांनी गड, किल्याचा इतिहास पहावा, जतन करावा, त्याचे पावित्र्य राखाणे गरजेचे आहे. मद्यप्राशन करून गड, किल्याचे पावित्र्य नष्ट करू नका अन्यथा शिवभक्त मावळे त्याचे प्रतिउत्तर आपल्या स्टाईलने देतील असा इशारा पर्यटकासह स्थानिकानाही मावळा प्रतिष्ठान, स्वराज्याचे शिलेदार या शिवभक्तांनी दिला आहे.

बाईट 1 : यतीराज पाटील, मावळा प्रतिष्ठान

बाईट 2 : अमोल चाळके, स्वराज्याचे शिलेदार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.