रायगड - कर्जत व भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे ते दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे अर्धा तास मुंबई पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या या मार्गावरील मेल, एक्सप्रेस आणि लोकल उशिराने धावत आहेत.


मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जत-भिवपुरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे मध्य रेल्वेकडून रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. काम आटोपल्यानंतर १० वाजून ६ मिनिटांनी पुन्हा रेल्वे सेवा सुरू झाली.
