ETV Bharat / state

खोपोलीतील मोहन रॉकीतील कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही - मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे - Mohan Rocky workers news

मोहन रॉकी येथील कामगारांची भूमिका मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांनी समजून घेत 15 मार्च रोजी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत कामगारांची भूमिका परखड मांडल्याने कंपनी व्यवस्थापनाचे दाबे दणाणले.

Mohan Rocky in Khopoli
गजानन राणे कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करताना
author img

By

Published : Mar 19, 2021, 7:57 PM IST

खोपोली(रायगड) - खोपोली शहरात अनेक वर्षापासून मद्य उत्पादन करणारी सुप्रसिद्ध कंपनी म्हणून मोहन रॉकी कंपनीची ओळख आहे. या कंपनीत अनेक वर्षापासून काही कामगारांवर अन्याय होत असल्याने कामगारांना न्याय मिळावा म्हणून येथील जवळपास 250 कामगारांनी मनसे कामगार सेनेचे प्रतिनिधित्व स्विकारून अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.

मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करताना

येथील कामगारांची भूमिका मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांनी समजून घेत 15 मार्च रोजी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत कामगारांची भूमिका परखड मांडल्याने कंपनी व्यवस्थापनाचे दाबे दणाणले. जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर मनसे कामगार सेना आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा गजानन राणे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.

हेही वाचा - इन्स्टाग्रामवर लहान मुलांनाही काढता येणार अकाउंट; फेसबुककडून सुरू आहे काम

250 हून अधिक कामगारांनी स्विकारले मनसे कामगार सेनेचे प्रतिनिधित्व

खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात मोठी औद्योगिक वसाहत असून याठिकाणी असंख्य कामगार नोकरी करीत रोजगार उपलब्ध करीत असतात. मात्र काही कारखानदार कामगारांचे शोषन करीत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करीत असल्याने कामगार वर्ग आपल्याला न्याय मिळावा म्हणून कामगार युनियन प्रतिनिधीकडे गाऱ्हाने मांडत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असून अशाच अन्यायाला वाचा फुटावी म्हणून खोपोली शहरातील नामंकीत मोहन रॉकी कंपनीतील जवळपास 250 हून अधिक कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचे प्रतिनिधित्व स्विकारल्याने येथील कामगारांनी बाजू समजून घेत मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांनी मोहन रॉकी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत पगार वाढ, बोनस, कँटींग, कामगारांची सुरक्षा आदी विषयावर परखड भुमिका घेत संबंधित कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरल्याने कंपनी व्यवस्थापनाचे दाबे दणाणल्याचे पाहायला मिळाले.

कामगारांना न्याय न दिल्यास पुढील काळात मनसे उग्र आंदोलन छेडणार

यावेळी गजानन राणे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, स्थानिक भुमिपुत्रावर होणारा अन्याय कधापी सहन करणार नाही, तसेच कामगारांना काम करताना योग्य त्या सोयीसुविधा न पुरवल्यास आम्ही मनसेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊ. लवकरात लवकर कामगारांच्या मागण्या पूर्ण करा असे मत राणे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे, उपाध्यक्ष मितेश खाडे, खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णुक, कामगार सेना जिल्हा चिटणीस अभिषेक दर्गे, खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे आदीसह अन्य मनसे पदाधिकारी - कार्यकर्ते व कामगार प्रतिनिधी उपस्थिती होते.

हेही वाचा - नाशकात कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळल्याची पालकमंत्री भुजबळांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.