ETV Bharat / state

माथेरानमध्ये भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार - आमदार प्रशांत ठाकूर - माथेरान भाजप न्यूज

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ६ जून रोजी माथेरानचा दौरा केला.

माथेरानमध्ये भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार - आमदार प्रशांत ठाकूर

author img

By

Published : Jun 7, 2021, 4:35 PM IST

खालापूर (रायगड) - प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये शिवसेनेसाठी राजकारणाचे उलटे वारे वाहू लागताच मध्यंतरी भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ६ जून रोजी माथेरानचा दौरा केला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोव्हीड १९ मुळे थंड हवेच्या पर्यटनस्थळावरील अर्थकारणाचा कणाच मोडल्याने येथील सर्वसामान्यांना कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले होते. यासाठी माथेरानकरांना दिलासा म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने जीवनावश्यक कीट वाटपासह काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश देखील करण्यात आला.

यावेळी प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिना कदम, संदीप कदम, अशोक शिंदे, त्रिभुवन तिवारी यांनी पक्ष प्रवेश केला. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने "मोदी भोजन कम्युनिटी किचन" या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक भागात जवळ जवळ १ लाख गरजू लोकांपर्यंत मोदी भोजन कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे पोचवले.

नवा बदल घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध

आमच्या पक्षावर विश्वास टाकून प्रवेश केलेल्या माथेरानमधील नगरसेवकांच्या सोबत भारतीय जनता पक्ष आहे. तर येणाऱ्या काळात पर्यटन व्यवसायाशी निगडीत अडचणी, वाहतूक व्यवस्थे संदर्भातील समस्या तसेच येथील घरांना अधिकृत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल. त्याचबरोबर नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आपण केलेले परिवर्तन समाजाच्या हितासाठी आणि माथेरानच्या विकासासाठी आहे. यासाठी जे प्रत्यक्ष बोलतो ते करत राहून एक नवा बदल घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित केले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्या निमित्त माथेरान नौरोजी लॉर्ड उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळ्यास, वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुतळ्यास तसेच हुतात्मा स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान शहराध्यक्ष विलास पाटील, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, प्रविण सकपाळ, कुलदीप जाधव, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, संजय भोसले, आनंद सकपाळ, किरण ठाकरे, दीपक बेहरे, बळवंत घुमरे, ऋषिकेश जोशी, ग्रामपंचायत सदस्य नेरळ संतोष शिंगाडे राजन लोभी, अनिल जैन, अनिल पटेल, राजेश भगत, शैलेंद्र दळवी, अरविंद शेलार, संजय कराळे तसेच नगरसेवक - नगरसेविका, पदाधिकारी व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.