रायगड - पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कामाचा झंझावात हा रायगडात सुरू असला तरी धार्मिक कार्यातही त्या हिरीरीने सहभागी होत असतात. रोहा येथील किल्ला गावात हरिनाम सप्ताहानिमित्त अदिती तटकरे कीर्तनात सहभागी झाल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ताल धरला. अदिती यांचा टाळ हातात घेऊन नाचतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
किल्ला येथे हरिनाम सप्ताहाचे केले होते आयोजन
रोहा तालुक्यातील किल्ला या गावात महिलांचा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाला रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना संयोजकांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार अदिती तटकरे या सप्ताहाला उपस्थित राहिल्या होत्या.
पालकमंत्री अदिती तटकरेंनी धरला ताल
हरिनाम सप्ताहाला भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कीर्तनात टाळ मृदुंगाच्या तालावर महिला वर्गाने ताल धरला होता. यावेळी आयोजकांनी पालकमंत्री यांनाही आग्रह धरला. अदिती यांनीही उपस्थितांना नाराज केले नाही.