ETV Bharat / state

सामाजिक भान..! मी उरणकर संस्थेकडून आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Raigad tribal community

'मी उरणकर' या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून 200 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप केले आहे.

मी उरणकर सामाजिक संस्थेकडून आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

author img

By

Published : May 2, 2021, 10:26 AM IST

रायगड - उरण तालुक्यातील "मी उरणकर सामाजिक संस्था" यांच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या 200 आदिवासी कुटुंबांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे. तर इतर संस्थानींही पुढाकार घेऊन आपापल्या क्षेत्रातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

कोरोना महामारीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. छोट्या-छोट्या वाड्या, वस्त्यांचा विचार केल्यास रोजगार नसल्याने येथील नागरिकांची अन्नपाण्याविना हाल होत आहेत. या वाड्या, वस्त्यांवरील आदिवासी बांधवांचे पोट हे हातावर असून, मोल मजुरी केल्यानंतर किंवा रानमेवा बाजारामध्ये विकल्यानंतर येणाऱ्या पैशामधून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र सध्या लॉकडाऊन स्थिती असल्याने, मजुरीचे काम हाताला नाही तर बाजारपेठा बंद असल्याने रानमेवा विक्री होत नाही. यामुळे आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेला आदिवासी बांधव चिंताग्रस्थ आहे.

आदिवासी समाजबांधवांच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून उरण तालुक्यामधील सामाजिक कार्यात धडाडीने काम करणाऱ्या 'मी उरणकर' या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून 200 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप केले आहे.

उरण तालुक्यातील नागाव-पिरवाडी, विंधणे आणि चिरनेर येथील आदिवासी वाड्यांवरील बांधवांना हे वाटप केले आहे. यावेळी या वाटपासाठी सदस्य शैलेश गावंड, विकास पाटेकर, बादल म्हात्रे, अतुल ठाकुर ,सुरज म्हात्रे राकेश पाटील, निलेश पाटील, अनिल पवार, भावेश रावत , तेजस बांबूलकर, विजेंद्र म्हात्रे यांनी मेहनत घेतली.

इतर संस्थानीही मदतीचा हात पुढे करावा

संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी वाटपादरम्यान बोलताना, आदिवासी बांधव हे आपल्या निसर्ग चक्रातील महत्वाचा भाग आहेत. त्यांच्यामुळे आपला निसर्ग अबाधित असून, निसर्गाचे संवर्धनही केले जात आहे. अशा आपल्या समाजबांधवांना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये मदतीचा हात पुढे करणे हे आमचे भाग्य असून, या बांधवांसाठी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन मदत करावी, असे आवाहनही यावेळी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.