ETV Bharat / state

गटारीला दुकाने उघडू द्या; मटण-चिकनची घरपोच सेवा देणे न परवडणारे, खाटीक व्यावसायिकांची मागणी

लॉकडाऊन सुरू असून जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा देण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. मात्र या आदेशाचा मटण, चिकन विक्रेत्यांनी निषेध केला आहे. घरपोच सेवा देण्याबाबत आम्ही जिल्हा प्रशासनाचे आदेश मानत असलो तरी मटण, चिकन घरपोच सेवा देताना आम्हाला अडचणी येत असल्याची तक्रार मटण-चिकन विक्रेत्यांनी केली आहे.

meat-chicken Home delivery service
गटारीला दुकाने उघडू द्या, खाटीक व्यावसायिकांची मागणी
author img

By

Published : Jul 17, 2020, 5:29 PM IST

रायगड - जिल्ह्यात अकरा दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा देण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. मात्र या आदेशाचा मटण, चिकन विक्रेत्यांनी निषेध केला आहे. घरपोच सेवा देण्याबाबत आम्ही जिल्हा प्रशासनाचे आदेश मानत असलो तरी मटण, चिकन घरपोच सेवा देताना आम्हाला अडचणी येत असून मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे यावेळीच्या गटारी सणाला आम्हाला कोट्यवधींचा आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया अलिबाग मटण, चिकन विक्रेत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गटारीला दुकाने उघडू द्या, खाटीक व्यावसायिकांची मागणी
श्रावण सुरू होण्याआधी येणारा गटारी सण हा मटण, चिकन खाऊन रायगडकर साजरा करीत असतात. 21 जुलै रोजी गटारी अमावस्या असून रायगडकर हे रविवारी 20 जुलै रोजी गटारी सण साजरा करतील. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्हा प्रशासनाने 15 जुलैपासून ते 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तूची किराणा, मटण, चिकन, भाजीपाला, फळे, मासळी याची दुकाने बंद राहणार असून दुकानदारांनी नागरिकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी दिली आहे.
meat-chicken Home delivery service
गटारीला दुकाने उघडू द्या, खाटीक व्यावसायिकांची मागणी
जिल्ह्यात गटारी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने मटण, चिकन विक्रेत्यांनी मोठया प्रमाणात बकरे, कोंबड्यांची खरेदी केली आहे. गटारीनिमित्त जिल्ह्यात मटण, चिकन विक्रेत्यांची कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम देऊन खरेदी केलेला माल हा अंगावर पडला असून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याचे अलिबाग मटण, चिकन विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष महेंद्र नखाते यांनी सांगितले. तर मटण, चिकन दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने घरपोच सेवा देण्याबाबत दिलेला आदेश आम्ही मानत आहोत. मात्र चिकन, मटण हे नाशवंत असून त्याची विक्री होणे गरजेचे आहे. त्यातच घरपोच सेवा देण्यासाठी लागणारे मनुष्यबळ यांचे पासेस हे कमी दिले जात असल्याने सेवा देण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर दुकानातून घरपोच सेवा देताना ग्राहकच बाजारात लॉकडाऊनमुळे येत नसल्याने आमचे नंबरही त्यांना कळणार नाही. मग घरपोच सेवा कोणाकडे करणार, ग्राहक हा दुकानात उभे राहून खरेदी करीत असतानाही कटकट करीत असतो, अशावेळी घरपोच सेवा देताना मटण, चिकन योग्य नसल्याचे सांगून ऑर्डर रद्द केल्यास त्याचाही भुर्दंड आम्हाला बसू शकतो. मटण, चिकन दुकाने बंद असल्याने गावात आता खासगी पद्धतीने बोकड, बकरे कापून ऑर्डर घेत असल्याने आम्ही घरपोच सेवा देऊनही आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच श्रावणानंतर सण सुरू होत आल्याचे मटण खरेदी कमी होत असते. त्यामुळे प्रशासनाने यावर लवकर निर्णय घेऊन रविवारी आम्हाला दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र घरत यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.