ETV Bharat / state

छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; अद्याप कोणालाही अटक नाही

तळोजामधील नितळस गावातील सतीश पावशे याच्यासोबत शर्मिलाचा विवाह झाला होता. लग्नमंडपातूनच सासरच्या मंडळींनी तिच्यावर जाच करण्यास सुरुवात केली होती.

married-girl-committed-suicide-in-raigad
married-girl-committed-suicide-in-raigad
author img

By

Published : Jan 4, 2020, 10:22 AM IST

रायगड - सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने विष पिऊन जीवन संपवले आहे. माहेरहून पैसे आणत नाही म्हणून तिचा छळ केला जात होता. पनवेलमधल्या नितलस गावात ही घटना घडली. लग्न होऊन जेमतेम सहा महिन्यातच नवविवाहितेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शर्मिला पावशे (वय 19) असे मृत नवविवाहितेच नाव आहे.

छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

हेही वाचा- 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'

तळोजामधल्या नितळस गावातील सतीश पावशे याच्यासोबत शर्मिलाचा विवाह झाला होता. लग्नमंडपातून सासरच्या मंडळीनी तिच्यावर जाच करण्यास सुरुवात केली होती. लग्नात जेवणासाठी नवरा सतीश पावशे याने आपल्याला मांसाहारी जेवण का दिले नाही? यावरून गोंधळ घातला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची समजूत काढली होती. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी साधारण दोन महिने तिला गुण्यागोविंदाने नांदविले. नंतर ते किरकोळ कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. गेल्या काही महिन्यांपासून माहेराहून दागिने आणि पैसे आण, असा तगादा शर्मिलाच्या मागे लावला होता. मात्र, तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे तिने टाळाटाळ केली होती. त्यातून तिला शिवीगाळ, मारहाण होऊ लागली होती.

हेही वाचा - पाकिस्तान : ननकाना साहेब गुरुद्वारावर जमावाकडून दगडफेक

आपण सतत देत असलेला त्रास ती निमूटपणे सहन करते पण माहेराहून पैसे आणि दागिने आणत नाही, हे पाहून शर्मिलाच्या सासरच्या मंडळींनी तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार ती तिच्या भावाला फोनवर सांगत होती. तिच्या भावनेही सासरच्या मंडळीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या त्रासातून सुटका मिळेल म्हणून शर्मिलाने अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घरातील विषारी औषध पिऊन तिने आत्महत्या केली. शर्मिलाच्या कुटुंबीयांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप केला.

शर्मिलाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर तळोजा पोलिसांनी शर्मिलाचा पती सतीश पावशे, सासू जयवंता पावशे, सासरे शमन पावशे, दीर जगदीश पावशे आणि नणंद दीपलता पाटील या पाच जणांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याने संतापलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला.

Intro:पनवेल

अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १८९वी जयंती....राज्यभरात सावित्रीमाईंची जयंती साजरी होत असतानाच माहेराहून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पनवेलमधील एक नवविवाहितेने विष पिऊन आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडलीये. पनवेलमधल्या नितलस गावात ही घटना घडलीये. धक्कादायक बाब म्हणजे लग्न होऊन सहा महिन्याच या नवविवाहितेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्यानं हळहळ व्यक्त होतीये. Body:शर्मिला पावशे असं या मृत नवविवाहितेच नाव असून ती केवळ 19 वर्षांचीच होती. मे 2019 मध्ये तिचा विवाह तळोजामधल्या नितळस गावातील सतीश पावशे याच्यासोबत झाला होता. धक्कादायक म्हणजे लग्नमंडपातून सासरच्या मंडळीनी तिच्यावर जाच करण्यास सुरुवात केली होती. लग्नात जेवणासाठी बसलेला नवरा मूलगा सतीश पावशे याने आपल्याला मांसाहारी जेवण का दिले नाही? यावरून लग्न मंडपात गोंधळ घातला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची समजूत काढली होती. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी साधारण दोन महिने तिला गुण्यागोविंदाने नांदविले. नंतर ते किरकोळ कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. गेल्या काही महिन्यांपासून माहेराहून दागिने आणि पैसे आण, असा तगादा सासरच्या मंडळींनी शर्मिलाच्या मागे लावला होता. मात्र, तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं तिच्या डोळ्यासमोर असल्यानं ती टाळाटाळ करीत होती. त्यातून तिला शिवीगाळ, मारहाण होऊ लागली.

आपण तिला सतत देत असलेला त्रास ती निमूटपणे सहन करतेय पण माहेराहून पैसे आणि दागिने आणत नाही हे पाहून शर्मिलाच्या सासरच्या मंडळीनी तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत तिला मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार ती तिच्या भावाला फोनवर सांगत होती. तिच्या भावनेही सासरच्या मंडळीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाषाण हृदयी माणसांच्या त्या काळजाला तरीही पाझर फुटला नाही. या सगळ्या त्रासातून सुटका मिळेल म्हणून 19 वर्षीय शर्मिलाने अखेर आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि घरात मुंग्याचं औषध पिऊन तिने आत्महत्या केली. Conclusion:सहा महिन्यांपूर्वी आपल्या बहिणीचे हात पिवळे करून सासरी सुखी राहील या आशेने पाठवलेल्या या नवविवाहितेच्या कुटुंबीयांनी मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली असल्याचा आरोप केलाय.

शर्मिलाच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने शर्मिलाच्या सासरकडील मंडळींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तळोजा पोलिसांनी शर्मिलाचा पती सतीश पावशे, सासू जयवंता पावशे, सासरे शमन पावशे, दीर जगदीश पावशे आणि नणंद दीपलता पाटील या पाच जणांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्यानं संतापलेल्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केलाय.

स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा होतेय. मात्र इतक्या वर्षांनंतरही स्त्रियांच्या अस्तित्वाचा प्रश्न मात्र जैसे थेच आहे. आजही कुटुंबात स्त्रियांची अवहेलना होतंच आहे. हे दुर्दैव चित्र या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलंय. त्यामुळे ज्या दिवशी महिलांविषयीचा दृष्टिकोन जोवर सहिष्णू व सहवेदनेचा होणार नाही त्यादिवशी खऱ्या अर्थाने सवित्रीमाईंची जयंती साजरी झाल्यासारखे वाटेल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.