रायगड - जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात गारांच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यात आंबा आणि काजू पिकाचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यातच अवकाळी पावसाने महाडमध्ये घराचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.