ETV Bharat / state

माघी गणेश जयंती भक्तिमय वातावरणात संपन्न, मंदिरांत भाविकांची मांदियाळी

माघी गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरात भाविकांची रेलचेल दिसून आली. भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासून दूरवरपर्यंत रांगा लावल्या.

माघी गणेश जयंती
माघी गणेश जयंती
author img

By

Published : Jan 28, 2020, 12:29 PM IST

रायगड - माघी गणेशोत्सव जयंती आज (मंगळवार) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी असलेल्या बल्लाळेश्वर, वरद विनायक, कुलाबा किल्ला, चौल, मुखरी, सिद्धिविनायक, बिर्ला गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून येत होते. तसेच, माघी गणेशोत्सवनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

रायगडमध्ये माघी गणेश जयंती उत्साहात

माघी गणेशोत्सवानिमित्त अलिबाग येथील प्रसिद्ध कुलाबा किल्ल्यातील सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवाारी पहाटे पासून भक्तांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील महड वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, नांदगावचा सिद्धिविनायक, साळवच्या बिर्ला मंदिर याठिकाणी गणेश दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भक्तांची गर्दी कायम राहणार आहे. त्यामुळे गणेश मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप आले आहे.

हेही वाचा - अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतिणीचा सुळका, प्रजासत्ताक दिनी कामगिरी

कुलाबा किल्ल्यात दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदाही कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने किल्ल्यात चोख व्यवस्था ठेवली आहे. पहाटेपासून गणेशभक्तांनी किल्ल्यात गर्दी केली. ओहोटीच्या वेळेत तसेच भरती असतानाही गणेशभक्तांचा ओघ सुरुच होता. यावेळी किल्ल्यात जाण्यासाठी घोडागाड्यांसह बोटीही तैनात करण्यात आल्या. मोठ्यांसह महाविद्यालयीन तरुणांची गर्दीही यावेळी पहायला मिळाली. माघी गणेशोत्सवनिमित्त कुलाबा किल्ल्यात आकर्षक रांगोळ्यांची सजावट, भजन, कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - अलिबाग नगरपरिषदेत सेवानिवृत्त शिपायाच्या हस्ते ध्वजारोहण

Intro:जिल्ह्यात माघी गणेशोस्तव जयंती भक्तिमय वातावरणात संपन्न

जिल्ह्यातील गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी

रायगड : माघी गणेशोत्सव जयंती आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी असलेल्या बल्लाळेश्वर, वरद विनायक, कुलाबा किल्ला, चौल,मुखरी, सिद्धिविनायक, बिर्ला गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या पहायला दिसत होत्या. माघी गणेशोत्सवनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात आज गणेश भक्तिमय वातावरण निर्माण झालेले होते.

Body:माघी गणेशोत्सवानिमित्त अलिबाग येथील प्रसिद्ध कुलाबा किल्ल्यातील सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवाारी पहाटे पासून भक्तांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होता. जिल्ह्यातील महड वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, नांदगावचा सिद्धिविनायक, साळवच्या बिर्ला मंदिर याठिकाणी गणेश दर्शनासाठी रात्री उशीरापर्यंत भक्तांची गर्दी कायम राहणार आहे. त्यामुळे गणेश मंदिर परीसराला जत्रेचे स्वरुप आले होते.
Conclusion:कुलाबा किल्ल्यात दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदाही कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने किल्ल्यात चोख व्यवस्था ठेवली होती. पहाटेपासून गणेशभक्तांनी किल्ल्यात गर्दी केली. ओहोटीच्या वेळेत तसेच भरती असतानाही गणेशभक्तांचा ओघ सुरुच होता. यावेळी किल्ल्यात जाण्यासाठी घोडागाड्यांसह बोटीही तैनात होत्या. मोठ्यांसह महाविद्यालयीन तरुणांची गर्दीही यावेळी पहायला मिळाली.

माघी गणेशोत्सवनिमित्त कुलाबा किल्यात रांगोळीही काढण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.