रायगड - मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात बुडणाऱ्या 9 पर्यटकांना जीवरक्षकांनी जीवदान दिले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे पर्यटक बुडू लागले होते. वेळीच जीवरक्षकांनी जीवाची बाजी लावून त्यांना बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नऊ जणांचे प्राण वाचले आहेत. पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.
पर्यटकांचा अतिउत्साह नडतो
‘मिनी गोवा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुडच्या काशrद समुद्र किनार्यावर देश-विदेशातून पर्यटक हजेरी लावतात. तर मुंबई, पुणेकर पर्यटकांचे हे आवडते पर्यटनस्थळ असल्याने विकेंडला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काशीद समुद्रकिनारा हा पर्यटकांचा आवडता समुद्रकिनारा आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे काशिद समुद्र किनार्यावर अनेकदा दुर्घटनांचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. मात्र, तरीही या घटनांकडे आणि सुरक्षेच्या उपायांकडे पर्यटकांकडून दुर्लक्ष केले जाते.


गुप्ता कुटूंबावरही होता काळाचा आघात -
पिंपरी चिंचवड येथून काशीद समुद्रावर कुमारी परिसिला गुप्ता (वय 15) या विद्यार्थिनीसह त्यांच्या परिवारातील इतर 3 सदस्यही काशीद समुद्रावर पर्यटनास आले होते. या ग्रुपमधील तीन जण समुद्राच्या पाण्यात मजा करण्यास गेले. या तिन्ही जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तेव्हा रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व अॅडव्हेंचर्सचे जीवरक्षकानी त्यांनाही पाण्यातून काढून त्यांचा जीव वाचविला.
रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व अॅडव्हेंचर्सच्या जीवरक्षकांमुळे वाचले प्राण -
रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व अॅडव्हेंचर्सचे लाईफगार्ड भावेश भोईर, संजय वाघमारे, निखिल शिंदे, राकेश वाघमारे यांनी यांनी त्यांच्या स्पीड बोटीच्या सहाय्याने या पर्यटकांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. या घटनेबाबत काशrद ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष राणे यांनी सांगितले की, पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. किनार्यालगत पोहणे आवश्यक असताना उत्साहाच्या भरात खोल पाण्यात ते ओढले जातात. आज जीवरक्षक व स्पीड बोटीमुळे पर्यटकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जीवदान मिळालेल्या सत्यम कुमार व त्यांच्या ग्रुपने तसेच गुप्ता परिवाराने काशिद बीच वॉटर स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांचे व रोहन खोपकर यांच्या संपूर्ण वॉटर स्पोर्ट्स टीमचे आभार मानले.
पंधरा दिवसांतील दुसरी घटना -
काशिद समुद्रात बुडणार्या पर्यटकांना वाचविण्याची ही गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी घटना आहे. याआधी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी काशिद समुद्रात बुडणार्या दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले होते. शुक्रवारी दुसर्यांदा समुद्रात बुडणार्या 9 पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.
हेही वाचा - VIDEO : काळी वाळू असलेला कर्नाटकातील तिलमटी समुद्रकिनारा!
हेही वाचा -विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श