ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरु

कशेडी घाटात धामणदिवी येथे असलेल्या डोंगरातील दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्गावरआल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. एका बाजूची दरड हटवून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

दरड हटवण्याचे काम सुरु
author img

By

Published : Jul 11, 2019, 10:12 PM IST

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ कशेडी घाटात धामणदिवी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी 7.30 वाजता दरड कोसळली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.

कशेडी घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरु

दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असून दरडीचा पडलेला मातीचा ढिगारा काढल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Intro:मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली

वाहतूक ठप्प

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ धामणदिवी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून रस्त्यावर आली असून जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरड काढण्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.Body:मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात धामणदिवी येथे असलेल्या डोगरातील दरड कोसळून महामार्गावर आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.Conclusion:दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या सहाय्याने दरड काढण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्यावर आलेली दरड एक बाजूने काढली असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे दरडीचा पडलेला मातीचा ढिगारा काढल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.