ETV Bharat / state

कोर्लई किल्‍ल्‍यावरील ६ तोफांचे पुनरुज्‍जीवन; सह्याद्री प्रतिष्‍ठानच्‍यावतीने तोफगाड्यांचे लोकार्पण - raigad

सह्याद्री प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते कोर्लई किल्यावर स्‍वच्‍छता मोहीमेसाठी गेले असता तेथे त्‍यांना या तोफा भग्‍नावस्‍थेत पडलेल्‍या आढळून आल्‍या. त्‍यानंतर या तोफांचे व्यवस्थित जतन करण्याचा संकल्‍प करण्यात आला.

कोर्लई किल्‍ल्‍यावरील ६ तोफांचे पुनरुज्‍जीवन
author img

By

Published : May 2, 2019, 9:39 PM IST

रायगड - मुरूड तालुक्‍यातील कोर्लई किल्‍ल्‍यावरील भग्‍नावस्‍थेत पडलेल्‍या सहा तोफांना जीवनदान मिळाले आहे. या सहा तोफा आता लाकडी तोफगाड्यांवर सुरक्षित ठेवण्‍यात आल्‍या आहेत. सह्याद्री प्रतिष्‍ठानच्‍यावतीने हा उपक्रम राबवण्‍यात आला आहे.

कोर्लई किल्‍ल्‍यावरील ६ तोफांचे पुनरुज्‍जीवन; सह्याद्री प्रतिष्‍ठानच्‍यावतीने तोफगाड्यांचे लोकार्पण

सह्याद्री प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते कोर्लई किल्यावर स्‍वच्‍छता मोहीमेसाठी गेले असता तेथे त्‍यांना या तोफा भग्‍नावस्‍थेत पडलेल्‍या आढळून आल्‍या. त्‍यानंतर या तोफांचे व्यवस्थित जतन करण्याचा संकल्‍प करण्यात आला. लोकवर्गणी काढून या तोफांसाठी सागवानी तोफगाडे तयार करण्‍यात आले. बुधवारी या सर्व तोफा समारंभपूर्वक या तोफगाडयांवर बसवण्यात आल्‍या आहेत. पूजन करून, भंडारा उधळून आणि शिवरायांची पालखी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या परिसरात ढोलताशांच्या गजरात फिरवून शिवगर्जना यावेळी दिल्या. यापुढे देखील असेच मोलाचे काम लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून अविरत करण्याची शपथ या कार्यकर्त्यांनी घेतली.

सह्याद्री प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्यासाठी शाहीर वैभव घरत, हिरवळ प्रतिष्‍ठानचे किशोर धारिया, शिवजयंती उत्‍सव समिती शिवनेरीचे अध्‍यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, अखिल भारतीय ढोलताशा संघाचे अध्‍यक्ष पराग ठाकूर, श्री शिवाजी रायगड स्‍मारक समितीचे सहकार्यवाह सुधीर थोरात, नागावचे सरपंच निखील मयेकर, मांगरूळचे सरपंच मंगेश दळवी व शेकडो दुर्गसेवक उपस्थित होते.

गेली १५ वर्षे सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात आणि गडकिल्ल्यांवर जाऊन सहयाद्री प्रतिष्‍ठान असे उपक्रम राबवत आहे. यापूर्वी सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कर्नाळा किल्ला, तुंब किल्ला, गोरखगड तसेच तोरणा किल्ल्यावर सागवानी दरवाजे बसवण्याचे मोलाचे काम पार पाडले आहे. त्याचप्रमाणे कुलाबा किल्ला, सिंहगड अशा ठिकाणी तोफगाडे बसवत तोफांना उर्जितावस्‍था प्राप्‍त करून देण्‍याचे काम करण्‍यात आले आहे.

Intro:

कोर्लई किल्‍ल्‍यावरील 6 तोफांचे पुनरूज्‍जीवन

सहयाद्री प्रतिष्‍ठानच्‍या वतीने तोफगाडयांचे लोकार्पण

रायगड : मुरूड तालुक्‍यातील कोर्लई किल्‍ल्‍यावरील भग्‍नावस्‍थेत पडलेल्‍या 6 तोफांना जीवनदान मिळाले आहे. या 6 तोफा आता लाकडी तोफगाडयांवर सुरक्षित ठेवण्‍यात आल्‍या आहेत. सहयाद्री प्रतिष्‍ठानच्‍या वतीने हा उपक्रम राबवण्‍यात आला.

सहयाद्री प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते कोर्लई किल्यावर स्‍वच्‍छता मोहीमेसाठी गेले असता तेथे त्‍यांना या तोफा भग्‍नावस्‍थेत पडलेल्‍या आढळून आल्‍या. त्‍यानंतर या तोफांना उर्जितावस्‍था देण्‍याचा संकल्‍प सोडण्‍यात आला. लोकवर्गणी काढून या तोफांसाठी सागवानी तोफगाडे तयार करण्‍यात आले.  बुधवारी या सर्व तोफा समारंभपूर्वक या तोफगाडयांवर बसवण्‍यात आल्‍या.  पूजन करून,भंडारा उधळून आणि शिवरायांची पालखी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या परिसरात ढोलताशांच्या गजरात फिरवून शिवगर्जना दिल्या आणि यापुढे देखील असेच मोलाचे काम लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून अविरत करण्याची शपथ घेतली.     Body:सह्याद्री प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्यासाठी शाहीर वैभव घरत,हिरवळ प्रतिष्‍ठानचे किशोर धारिया, शिवजयंती उत्‍सव समिती शिवनेरीचे अध्‍यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, अखिल भारतीय ढोलताशा संघाचे अध्‍यक्ष पराग ठाकूर, श्री शिवाजी रायगड स्‍मारक समितीचे सहकार्यवाह सुधीर थोरात, नागावचे सरपंच निखील मयेकर, मांगरूळचे सरपंच मंगेश दळवी, शेकडो दुर्गसेवक उपस्थित होते.Conclusion:गेली 15 वर्षे सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात आणि गडकिल्ल्यांवर जाऊन सहयाद्री प्रतिष्‍ठान असे उपक्रम राबवत आहे. यापूर्वी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने कर्नाळा किल्ला, तुंब किल्ला, गोरखगड, तसेच तोरणा किल्ल्यावर सागवानी दरवाजे बसविण्याचे मोलाचे काम पार पाडले आहे. त्याचप्रमाणे कुलाबा किल्ला, सिंहगड अशा ठिकाणी तोफगाडे बसवत तोफांना उर्जितावस्‍था प्राप्‍त करून देण्‍याचे काम करण्‍यात आले आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.