रायगड (खालापूर) - मध्य रेल्वेच्या खोपोली व कर्जत या मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकाजवळील पूल धवार 21 जुलैच्या मध्यरात्री वाहून गेला होता. त्यामुळे खोपोली व कर्जत दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून दिवसरात्र 250 ते 300 कामगारासह 2 जेसीबी, 3 हायड्राच्या साहाय्याने दुरुस्ती काम सुरु आहे. रेल्वे प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. दरम्यान, लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल, असे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
बुधवारी रात्री केळवली-डोळवली या दोन स्थानकामधील पूल वाहून गेला
खालापूर तालुक्यात रोज येणाऱ्या जोरदार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. 21 जूलै बुधवारी रात्री केळवली-डोळवली या दोन स्थानकामधील पूल वाहून गेला. त्या मार्गाचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे हा खोपोली ते कर्जत पर्यंतची रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद ठेवण्या आला आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे.
माल गाडीच्या साहाय्याने मालाची केली जाते पुर्तता
खोपोली-कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने, पूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरु करून रेल्वे सेवा सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे. सर्व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तत्परतेने दुरुस्ती काम हाती घेतले आहे. दिवसरात्र 250 ते 300 कामगारासह 2 जेसीबी, 3 हायड्राच्या साहाय्याने दुरुस्ती काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यामुळे हे काम लवकरच पूर्ण होऊन रेल्वे सेवा पुर्ववत होईल शी अशा सर्व प्रवासी वर्गाला आहे.