कर्जत (रायगड) : खालापूर नगरपंचायत हद्दीतील काही आदिवासी वाड्यांपैकी शिरवलीवाडी आणि मठाचीवाडीतील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना दोन - तीन किलोमीटरवर चालत जाऊन डोक्यावर हंड्याने पिण्यास पाणी आणावं लागत आहे. येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्जत - खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिरवलीवाडी आणि मठाचीवाडी येथे तीन हजार लीटरच्या दोन टाक्या दिल्या आहेत. पाण्यासाठी होणारी वणवण कमी करण्याचा प्रयत्न केल्याने येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या टाक्याचे 17 एप्रिल रोजी शिवसेना नेते रोहित विचारे व बिपिन घाटवल यांच्या हस्ते उघ्दाटन करण्यात आले.
दोन्ही वाड्यातील महिलांकडून समाधान व्यक्त-
खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडी आणि मठाचीवाडीतील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या गांभीर्याने घेत थोरवेंनी तीन हजार लिटरच्या दोन टाक्या देत येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या टाक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार नवीन घाटवळ यांनी स्वतःच्या बोरिंगमधून दिल्याने येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. तर या दोन्ही टाक्याचे उघ्दाटन 17 एप्रिल रोजी शिवसेना नेते रोहित विचारे व बिपिन घाटवल यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दोन्ही वाड्यातील महिलांनी समाधान व्यक्त केले. पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवल्याने आमदार महेंद्र थोरवे व शिवसेना जिल्हा सल्लागार नविन घाटवल याचे आभार मानले. यावेळी रोहित विचारे, बिपीन घाटवळ, अवधूत भुर्के, नितिन पाटिल, निखिल मिसाळ, अमित जगताप, स्वप्नील खराळ, पवार दादा, प्रफुल खडकबाण आदी प्रमुखांसह ग्रामस्थ - महिला वर्ग उपस्थित होता.