ETV Bharat / state

Income Tax Department Raids : उरणच्या कंपनीमध्ये 100 जणांसह आयकर विभागाचा छापा; कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसून तपासणी

author img

By

Published : Nov 25, 2022, 6:22 PM IST

गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड (जीडीएल) (Gateway Districtparks Limited Uran) या कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड (Income Tax department raids Uran company GDL) टाकली. सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून, कागदपत्रं व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसून तपासणी (Examination of financial turnover of company) यावेळी करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी कंपनीचे गेट बंद करून कर्मचारी, अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ ठेवण्यास भाग पाडले होते. Latest news from Raigad, Raigad Crime

Income Tax Department Raids
जीडीएल कंपनी

रायगड : येथील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड (जीडीएल) (Gateway Districtparks Limited Uran) या कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड (Income Tax department raids Uran company GDL) टाकली. सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून, कागदपत्रं व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसून तपासणी (Examination of financial turnover of company) यावेळी करण्यात आली आहे. संबंधित कारवाई ही गुप्त कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. एकंदरित या कारवाईनंतर उरण तालुक्यातील कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर (Companies in Uran taluka on IT department radar) असल्याचे बोलण्यात येत आहे. Latest news from Raigad, Raigad Crime

गुप्तता राखण्यासाठी पोलिसांनाही दूर ठेवले - उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल )
या कंपनीतून कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात -निर्यात केली जाते. या कंटेनर यार्डमधून सोने, अंमली पदार्थ, रक्तचंदन आणि इतर तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे हे कंटेनर यार्ड याआधीच डीआरआय, न्हावा- शेवा सीमा शुल्क, पोलिस यंत्रणेच्या रडारवर आहे. तस्करीच्या घटनांमुळे याआधीच सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर असलेल्या कंपनीवर गुरुवारी सकाळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.

माहितीसाठी आलेल्या पोलिसांना परत पाठविले - गुरुवारी सकाळी ११ वाजता गुप्तपणे टाकण्यात आलेल्या धाडीत सुरक्षा यंत्रणांसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी कंपनीचे गेट बंद करून कर्मचारी, अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ ठेवण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आतमधील कारवाईची खबरबात लागणे अशक्य होऊन बसले होते. छाप्याची खबर मिळताच उरण पोलिसांनी इन्कमटॅक्स विभागाचे अधिकारी आणि कंपनीकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कारवाई गुप्त असल्याचे सांगत माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची खात्रिशीर माहिती मिळत आहे. या कारवाई प्रकरणात इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही अधिक माहिती मिळते का याची घेण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहेत.

उरणमधील कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर - भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर गेली असून ही मुळे उखाडणायाचा प्रयत्न करण्यासाठी निरनिराले उपाय करण्यात येत आहेत. विविधता क्षेत्रामधून होतं असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकार उघड झाले आहेत. तर आयकर विभागाने उरण तालुक्यामध्ये डिस्ट्रिकपार्कवर पडलेल्या धाडिंनंतर आता आयात-निर्यातीच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे यंत्रणानी लक्ष केंद्र केलं असावं असा कयास या करावाईंनंतर करण्यात येत आहे. तर या अनुषंगाने उरण तालुक्यातील कंपन्या आयकर विभागाच्या रडारावर असल्याचे म्हटलेजात आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.