ETV Bharat / state

पनवेलचा ऐतिहासिक वारसा असलेल्या तोफांची प्रतिष्ठा पणाला...प्रशासनाचे दुर्लक्ष

author img

By

Published : Jan 3, 2020, 9:21 AM IST

Updated : Jan 3, 2020, 9:39 AM IST

पनवेलमधल्या शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तोफा पनवेल महापालिकेच्या प्रवेशद्वाराशेजारीच निधड्या छातीने ऊन, वारा, पावसाचा सामना करत आजही धाडसाने उभ्या आहेत.

historical gun
पनवेलचा ऐतिहासिक वारसा असलेल्या तोफांची प्रतिष्ठा पणाला

रायगड - एकीकडे राज्य व केंद्र सरकार महापुरुषांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या स्मारकांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. तर, दुसरीकडे पनवेलमध्ये अनमोल वारसा असलेल्या ऐतिहासिक तोफांची अवस्था 'नाही चिरा नाही पणती' अशीच, म्हणजेच अत्यंत बिकट झाली आहे. या तोफांच्या शेजारीच डेब्रिज, मातीचे ढिगारे, पाईप, अनावश्यक साहित्य पडले आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - #CAA Protest : वंचित बहुजन आघाडी करणार राज्यभर आंदोलनं, ४ जानेवारीपासून सुरूवात

पनवेलमधल्या शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तोफा पनवेल महापालिकेच्या प्रवेशद्वाराशेजारीच निधड्या छातीने ऊन, वारा, पावसाचा सामना करत आजही धाडसाने उभ्या आहेत. पण, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या डेब्रिजचे ढिगारे, गोण्या, मोडकळीस आलेले पाईप, लोखंडी सळ्या यामुळे पनवेलचा शिवकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या या तोफांचा इतिहास नामशेष होतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पनवेल शहरातील बंदराजवळ उत्खननात या शिवकालीन तोफा सापडल्या होत्या.

पनवेलमधल्या शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तोफांचं जतन व्हावं, म्हणून या तोफा इकडे तिकडे न ठेवता त्या पनवेल पालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पनवेल महापालिकेच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणि दुरुस्तीच्या कामातून निघणारा डेब्रिजचा कचरा या शिवकालीन तोफांच्या शेजारीच ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - ''अभ्यासपूर्ण पध्दतीने नाटकाकडे पाहण्याचा प्रयत्न 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा ही इच्छा''

या तोफांच्या आजूबाजूला कचऱ्याने भरलेल्या गोण्या आणि लोखंडी सळ्या पाहून शिवकालीन तोफांचा इतिहास नामशेष होत असल्याचे चित्र दिसून येते. दुर्लक्षित अवस्थेत पडल्या असल्यामुळे या तोफा गंजून वाईट स्थितीत पडल्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या प्रशासनाला याचं गांभीर्य कळलं नाही की न कळल्यासारखं ढोंग करतायेत, हाच प्रश्न निर्माण होत आहे.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे.

बाईट:- गणेश रघुवीर, अध्यक्ष, दुर्ग संवर्धन विभाग,सह्याद्री प्रतिष्ठान

पनवेल

एकीकडे राज्य व केंद्र शासन महापुरुषांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या स्मारकांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे पनवेलचा एक अनमोल ऐतिहासिक वारसा असलेल्या ऐतिहासिक तोफांची अवस्था अक्षरशः नाही चिरा नाही पणती म्हणावी अशीच झालीये.Body:पनवेलमधल्या शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तोफा पनवेल महापालिकेच्या प्रवेशद्वाराशेजारीच निधड्या छातीने ऊन, वारा, पावसाचा सामना करत आजही धाडसाने उभ्या आहेत. पण त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या डेब्रिजचे ढिगारे, गोण्या, मोडकळीस आलेले पाइप, लोखंडी सळ्या या तोफांच्या आजूबाजूला दिसत असल्यानं पनवेलचा शिवकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या या तोफांचा इतिहास नामशेष होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. पनवेल शहरातील बंदराजवळ उत्खननात या शिवकालीन तोफा सापडल्या होत्या. पनवेलमधल्या शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तोफांचं जतन व्हावं म्हणून या तोफा इकडे तिकडे न ठेवता त्या पनवेल नगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता पनवेल महापालिकेच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारं बांधकाम साहित्य आणि दुरुस्तीच्या कामातून निघणारा डेब्रिजचा कचरा या शिवकालीन तोफांच्या शेजारीच ठेवण्यात आलाय.

Conclusion:शिवकालीन तोफांच्या आजूबाजूला कचऱ्याने भरलेल्या गोण्या आणि लोखंडी सळ्या पाहुन शिवकालीन तोफांचा इतिहास नामशेष होत असल्याचं चित्र दिसून येतंय. दुर्लक्षित अवस्थेत पडल्या असल्यामुळे या तोफा गंजून वाईट स्थितीत पडल्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद अशी जाहीरातबाजी करणाऱ्या प्रशासनाला याचं गांभीर्य कळलं नाही की न कळल्यासारखं ढोंग करतायेत, हाच प्रश्न निर्माण होतोय.
Last Updated : Jan 3, 2020, 9:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.