श्रीवर्धन रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र मंदिराच्या जवळच समुद्रामध्ये एक बेवारस बोट आढळून आली आहे Suspected boat with AK 47 rifles In raigad . सकाळी आठ वाजता स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले की, या ठिकाणी कोणती तरी बोट उभी आहे. त्यानंतर त्या ठिकाणच्या पोलीस पाटलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्याला माहिती दिली . श्रीवर्धन पोलिसांचे पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. सदर बोटीची झाडाझडती घेतली असता. त्यामध्ये तीन एके 47 गन आढळून आल्या AK 47 rifles bullets found on boat near Harihareshwar beach . तसेच काही कागदपत्रे देखील आढळून आली. सदरची बोट ही ओमान सिक्युरिटीची बोट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच ही भरकटलेली स्पीडबोट असल्याचे म्हटले जात आहे.
एटीएसचे पथक रायगड दाखल तसेच दहशतवादी घातपाताचा कट आहे का? या दिशेने तपास कारण्यासाठी राज्यात एटीएसचे पथक रायगड येथे दाखल झाले आहे ATS team arrived at Raigad . एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. ऐन सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले असल्याने राज्यात हायअलर्ट आणि मुंबईत ठिकठिकणी नाकाबंदी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मोठ्या प्रमाणात हा शस्त्रसाठा सापडल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. तीन एके ४७ रायफली आणि मोठ्य़ा प्रमाणात काडतुसे या बोटीत सापडली आहेत. एखाद्या मोठ्या हल्ल्याचा हा कट होता का, या पार्श्वभूमीवर एटीएस तपास करत आहेत. एटीएस प्रमुख विनित अग्रवाल हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.