रायगड - 'प्रदूषणमुक्त भारत' हा संदेश जनमानसात रूजावा, यासाठी पनवेलमधील एका चमूने सायकलवरून केवळ 11 दिवसांत पनवेल-पुणे-कन्याकुमारी असा प्रवास पूर्ण केला आहे.
एकुण १८०० किलोमीटरचा हा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे मार्गदर्शक असलेल्या सुमित नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी, एकदा तरी त्यांच्या विद्यार्थ्यांनी पनवेल ते कन्याकुमारी सायकल प्रवास करावा असे स्वप्न पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला होता. प्रवास पूर्ण करून हे तरुण पनवेल रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - प्रदूषणमुक्तीसाठी सहकारमंत्र्यांची सायकलवरून रपेट
या सर्व प्रवाशांच्या सायकली अगदी सर्वसामान्य होत्या. सगळ्या अडचणीवर माझ्या विद्यार्थ्यांनी यशस्वी मात करीत पनवेल-कन्याकुमारी हा प्रवास केला, याचा मला आनंद आहे, अशी भावना यावेळी सुमित नलावडे यांनी व्यक्त केली आहे.