रायगड - पनवेलच्या कळंबोलीत राहणाऱ्या एका ७ वर्षीय बालिकेचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. इमारतीच्या छतावर साजरा होत असलेल्या वाढदिवसाला जात असताना लोखंडी जिन्यावरील विद्युतप्रवाहित तारेला तिचा हात लागला. यात रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. आर्या कोडक असे या मुलीचे नाव आहे.
कळंबोलीतील सेक्टर 4 ई मधल्या के. एल. बिल्डिंगमध्ये कोडक यांचे कुटुंब राहताहेत. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या इमारतीच्या छतावर वाढदिवस साजरा होत होता. या वाढदिवसाला जाण्यासाठी आर्या निघाली होती. दरम्यान, लोखंडी जिन्यावरून जात असताना अचानक तिचा हात विद्युत प्रवाहित तारेला लागला. तिने एकदम आरडाओरड केली, त्यावेळी टेरेसवरील मंडळींनी तिच्याजवळ धाव घेतली. मात्र, तोपर्यंत ती बेशुध्द झाली होती.
हेही वाचा - पनवेलचे सुशोभीकरण झाडांच्या मुळावर; वृक्षतोडीवर नागरिकांची नाराजी
आर्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. आर्या हिच्या अकस्मात मृत्यूने कोडक परिवारासह संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - पनवेल महानगरपालिका: नगरसेविका मुग्धा लोंढेंच्या निधनानंतर रिक्त जागेवर मुलगी रुचिताला उमेदवारी