ETV Bharat / state

महाडमधील सावित्री नदीच्या पुलावर मगरीचा मुक्त संचार

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे सावित्री नदीतील एक मगर गांधारी पुलावर मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गांधारी पुलावरील मगरीचे छायाचिञ
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:26 PM IST

रायगड - जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे सावित्री नदीतील एक मगर गांधारी पुलावर मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गांधारी पुलावर मगरीचा मुक्त संचार
रात्रीच्या सुमारास नदीत असलेल्या मगरीं पैकी एक मगर अचानक वाहत्या पाण्याबरोबर पुलावर आली. या पुलावर तिचा संचार सुरू होता. त्यानंतर ही बाब महाडकरांच्या लक्षात आल्यावर तिला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी त्या मगरीचा व्हिडिओ उपस्थितांपैकी एकाने काढून सोशल मीडियावर टाकला. मगरीच्या संचाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुराचे पाणी कमी झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात परत गेली. महाडमधील सावित्री नदीत अनेकदा या मगरी पाहावयास मिळतात. पुरामुळे ती पुलावर आल्याने ती शहरातही घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Intro:
पुरामुळे मगर आली पुलावर पूर ओसरल्यानंतर गेली नैसर्गिक अधिवासात

महाडच्या गांधारी पुलावर मगरीचा मुक्त संचार

रायगड : 27 रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाडमधील सावित्री नदीलाही पूर आल्याने शहरात व बाजारात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे सावित्री नदीतील एक मगर गांधारी पुलावर रात्रीच्या सुमारास मुक्त संचार करतानाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.Body:महाडमध्ये पावसामुळे पूर आला होता. या पुरामुळे गंधारी नदीच्या पुलावरूनही पाणी जात होते. रात्रीच्या सुमारास नदीत असलेल्या मगरी पैकी एक मगर पाण्यासोबत गांधारी पुलावर विहार करण्यास आली. या पुलावर तिचा मुक्त संचार सुरू होता. या पुलावरून जाणाऱ्या लोकांना मगर असल्याचे दिसली त्यानंतर हि बाब महाडकरांना कळल्यावर तिला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. त्यावेळी या मगरीचा मुक्त संचाराचा व्हिडीओ उपस्थित व्यक्तीने काढून सोशल मीडियावर टाकला होता.Conclusion:या मगरीच्या मुक्त संचाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र पुराचे पाणी कमी झाल्यानंतर मगर ही पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात परत गेली. महाड सावित्री नदीत मगर असून अनेक वेळेला या मगरी पहावयास मिळतात. मात्र पुरामुळे ही मगर पुलावर आल्याने शहरातही पुराचे पाणी घुसत असल्याने शहरातही मगर घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.