ETV Bharat / state

Dak Movie Shooting : 'डाक'चे चित्रीकरण पूर्ण; प्रगत तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण कथानक असलेला भयपट - Marathi Horror Movie

'डाक' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले असून भयपटावर आधारित हा चित्रपट आहे. महेश नेने प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'डाक' या चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी रतिश तावडे आणि महेश नेने यांनी स्वीकारली आहे. तर या चित्रपटाचे चित्रीकरण रायगड जिल्ह्यातील नयनरम्य कोलाडजवळील बैजनाथ गावात करण्यात आले.

Dak Movie Shooting
डाक मराठी चित्रपट
author img

By

Published : Jan 14, 2023, 3:25 PM IST

मुंबई : मराठी सिनेमांचा दणका हॉलिवूड पर्यंत पोहोचलेला दिसतो. यांचे प्रमुख कारण म्हणजे विषयांची वैविध्यता आहे. मराठीत सर्वच जॉनारचे चित्रपट बनत असतात. परंतु विनोदी, आशयघन आणि मसालापटांच्या तुलनेत मराठीत भयपटांची संख्या फार कमी आहे. काळानुरुप बदल करत नावीन्याच्या ध्यासाने मराठी सिनेमांची निर्मिती केली जाणे हा एक मराठी सिनेमांचा वेगळा पैलू नेहमीच जगासमोर आला आहे. विनोदी चित्रपटांच्या लाटेत एखादा असा चित्रपट येतो जो रसिकांसोबत सर्वांचंच लक्ष वेधून घेतो.

भयपटावर आधारित 'डाक' : 'डाक' असं शीर्षक असलेला आगामी मराठी भयपट हीच उणीव भरून काढणार आहे. नुकतेच 'डाक' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. महेश नेने प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'डाक' या चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी रतिश तावडे आणि महेश नेने यांनी स्वीकारली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण रायगड जिल्ह्यातील नयनरम्य कोलाडजवळील बैजनाथ गावात करण्यात आले.

थरारक अनुभव देणारा चित्रपट : हिंदीमध्ये रामसे बंधू आणि राम गोपाल वर्मा यांच्या भयपटांनी रसिकांच्या मनाचा थरकाप उडवला होता. त्याच वाटेने जात 'डाक' हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवत थरारक अनुभव देणार असल्याचे जाणवते. चित्रपटाचे नेमके कथानक काय आहे हे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आले असले तरी लवकरच याचे रहस्य उलगडणार आहे. हा चित्रपट मनात कुतूहल जागवणारा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एका अनोख्या विश्वाची सफर घडवत एक वेगळा अनुभव देणारा ठरेल.

या कलाकरांचा समावेश : 'डाक'च्या माध्यमातून मराठी सिनेरसिकांसमोर भयपट सादर होत असून प्रगत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कथानकाच्या आधारे रसिकांना नवरसांमधील भय या रसाचा अनुभव घेता येणार आहे. महेश नेने यांनी यापूर्वी 'चिमाजी अप्पा' या चित्रपटाची घोषणा केली असून, सध्या या चित्रपटाचे कामही वेगात सुरू आहे. अश्विनी काळसेकर, संजीवनी जाधव, अनिकेत केळकर आदी कलाकारांनी डाक या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

हेही वाचा : Top 5 Men Mentioned List: गोल्डन ग्लोबमध्ये सर्वाधिक चर्चित व्यक्तीमत्व ठरला ज्युनियर एनटीआर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.