ETV Bharat / state

MIDC विरोधी आंदोलनाची पुढील दिशा गडबच्या बैठकीत ठरणार - आमदार जयंत पाटील - Farmers and villagers protest march

प्रस्तावित डोलवी एमआयडीसी संघर्ष समितीच्या (Dolvi MIDC Struggle Committeeon) वतीने 11 गावातील शेतकरी व ग्रामस्थांचा एमआयडीसी भुसंपादन रद्द करावे या प्रमुख मागणीसह व खारेपाण्याने भिजलेल्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी, जेएसडब्लू कंपणीमुळे होणारे प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास यावर नियंत्रण असावे. इतर मागण्या घेवून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला होता. एमआयडीसी विरोधी आंदोलनाची पुढील दिशा गडबच्या बैठकीत ठरणार असल्याचे शेकाप आमदार जयंत पाटील (MLA jayant patil on proposed Dolvi MIDC) यांनी सांगितले.

Dolvi MIDC Struggle Committeeon
Dolvi MIDC
author img

By

Published : Jan 12, 2022, 4:52 PM IST

पेण (रायगड) - आमदार जयंत पाटील यांनी (MLA jayant patil on proposed Dolvi MIDC) शेतकरी मोर्चात सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांचा नियोजित डोलवी एमआयडीसी प्रकल्पास विरोध आहे. तसेच विधिमंडळ अधिवेशनात सरकार समोर शेतकऱ्याची बाजू मांडताना येथील स्थानिकांना विश्वासात घेवून येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करून विकास केला जावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे पेण येथील शेतकऱ्यांच्या विरोधापुढे राज्य सरकार नरमणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून एमआयडीसी विरोधी आंदोलनाची पुढील दिशा गडबच्या बैठकीत ठरणार असल्याचे शेकाप आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रस्तावित डोलवी एमआयडीसी संघर्ष समितीच्या (Dolvi MIDC Struggle Committeeon) वतीने 11 गावातील शेतकरी व ग्रामस्थांचा एमआयडीसी भुसंपादन रद्द करावे या प्रमुख मागणीसह व खारेपाण्याने भिजलेल्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी, जेएसडब्लू कंपणीमुळे होणारे प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास यावर नियंत्रण असावे. इतर मागण्या घेवून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला होता. बाधित 11 गावच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पेण रोहा तालुक्यातील अनेक शेतकरी तशेच ग्रामस्थ विशेषत: कासु विभागातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी काळाची पावलं ओळखून मोठ्या प्रमाणात मोर्चात सामील होऊन पाठिंबा दिला. या मोर्चात अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांची शेतकरी प्रतिनिधीनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, मी तुमच्या सोबत आहे, या भागाच्या विकासाकरिता सर्वांनी एकत्र यावे. आजची तरुण पिढी सक्षम आहे. त्यांना विकास काय हे कळतेय. त्यामुळे विकासाची भाषा करणाऱ्यांनी स्थानिकांना काय हवयं ते पहिल्यांदा पाहावे. जेएसडब्लु या खाजगी कंपनीसाठी होऊ घातलेला एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, या अगोदरच यातील काही गावांना सिडको आरक्षण पडलेलं असताना त्यात एमआयडीसी कसं आणता, या संपूर्ण विभागात आर झोनची मागणी केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. असे असताना सरकारने जर आपलं म्हणणं ऐकलं नाही तर मोठं जनआंदोलन उभारले जाईल. त्यासाठी लवकरच गडब येथे शेतकऱ्यांची बैठक घेवून पुढील रणनीती ठरवली जाईल, असे शेवटी त्यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, शेतकरी कमिटी संयोजक के.जी.म्हात्रे, गजानन पेढवी, विजय पाटील, सीताराम चवरकर, सदानंद ठाकूर, परशुराम म्हात्रे, अॅड. देविदास म्हात्रे, प्रभाकर पाटील, एकनाथ म्हात्रे, के.पी.पाटील, दिलीप पाटील, दिनेश म्हात्रे, बळीराम कोठेकर, राजू पाटील, महेंद्र पाटील, प्रवीण म्हात्रे याच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.