रायगड - मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना रायगडसह कोकणात विशेष रेल्वेने पोहोचवा, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेण आणि महाडमध्ये कोव्हिड रुग्णालय तयार करा, अशी मागणी महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे मागणीचे पत्र दिले आहेत.
तसेच माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या दोन महिन्याची पेन्शन म्हणजेच असा एक लाखांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. चाकरमान्यांना आणण्यासाठी मी तसेच जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी हे सहकार्य करतील, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात पनवेल, उरण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून जिल्ह्यातील काही भागातही रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे एमजीएम, तसेच कोव्हिड रुग्णालयांवर ताण पडत आहे. यासाठी पुढच्या दृष्टीने पेण आणि महाडमध्ये कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्याची मागणीही जगताप यांनी केली आहे.
हेही वाचा - कर्नाटक, गोंदिया आणि रावेर मधील मजुरांना घेऊन विशेष बस रवाना...