ETV Bharat / state

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत, पाच लाखांपर्यंतच्या ठेवी मिळणार परत - डिपॉझिट इन्शुरन्स

केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा फायदा पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना होणार आहे. पेण अर्बन बँकेच्या एक लाख 98 हजार ठेवीदारांपैकी सुमारे एक लाख 95 हजार ठेवीदारांना त्यांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी असल्यामुळे त्या परत मिळणार आहेत. ही रक्कम जवळपास पाचशे कोटी रुपयांपर्यंत असणार आहे. केंद्र शासनाच्या या नवीन कायद्यामुळे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 22, 2021, 6:48 PM IST

पेण (रायगड) - संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ठेव हमी कायद्यात केलेल्या बदलाचा फायदा पेण अर्बनच्या लाखो ठेवीदारांना होणार असून पाच लाखापर्यंत ठेव असलेल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत. संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने दहा वर्षांपूर्वी पेण अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे बँकेतील सुमारे एक लाख 98 हजार ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत अडकून आहेत. ठेव हमी योजनेतील कायद्यानुसार फक्त एक लाखापर्यंत ठेवी व त्यावरील व्याज त्यांना संरक्षण होते. आता या कायद्यात बदल करून या रक्कमेवरील संरक्षण हे पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक मागील वर्षी दिवाळखोरीत निघाल्यावर डिपॉझिट इन्शुरन्स वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडीट कॉर्पोरेशन कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार बँकेच्या ग्राहकांना मुळ रक्कम व व्याज मिळून पाच लाखांच्या रकमेपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. आतापर्यंत केवळ एक लाख रुपयांपर्यंत ठेवींनाच संरक्षण होते. त्यामुळे बुडीत बँकेच्या ठेवीदारांना एक लाखांवरील रकमेवर पाणी सोडावे लागत होते. आता केंद्र सरकारने कायद्यात बदल केल्याने या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत त्या दिवसांपासून नव्वद दिवसांच्या आत ही रक्कम अदा करावी लागणार असल्याचे या कायद्यात म्हटले आहे.

ठेवीदारांच्या आशा झाल्या पल्लवीत

केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा फायदा पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना होणार आहे. पेण अर्बन बँकेच्या एक लाख 98 हजार ठेवीदारांपैकी सुमारे एक लाख 95 हजार ठेवीदारांना त्यांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी असल्यामुळे त्या परत मिळणार आहेत. ही रक्कम जवळपास पाचशे कोटी रुपयांपर्यंत असणार आहे. केंद्र शासनाच्या या नवीन कायद्यामुळे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पेण अर्बन बँकेच्या 99 टक्के ठेवीदारांना मिळणार फायदा

केंद्र शासनाने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेला बदल हा निश्चितच स्वागतार्ह आहे. या कायद्यामुळे पाच लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळणार आहे. या कायद्याचा फायदा पेण अर्बन बँकेच्या एकूण ठेवीदारांपैकी 99 टक्के ठेवीदारांना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी दिली.

हेही वाचा - रायगड : उरण नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.