ETV Bharat / state

रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी - Black market of Remedesivir injections

खोपोली शहरातून रेमेडीसीवर इंजेक्शनचा वाढीव दराने व अवैध मार्गाने खरेदी - विक्री करणाऱ्या तीन तरूणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून नऊ इंजेक्शन जप्त केली आहेत.

blackmailed the injections on Remedesivir
खोपोलीतील ३ आरोपींना केले अटक
author img

By

Published : May 3, 2021, 8:52 PM IST

खालापूर (रायगड) - देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढली असल्याने संपूर्ण राज्यात लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. संसर्ग प्रमाण कमी करण्यासाठी व नागरिकांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकार उत्तम सेवा देण्यास दिवस रात्र मेहनत घेत असून या बरोबर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा आपापल्या परीने मेहनत घेत आहेत. एकीकडे नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी सेवा देणारे अनेक कोरोना योद्धा तर दुसरीकडे कोरोनाबाधितांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अनेक नराधम यांचे प्रमाण वाढले आहे.

खोपोलीतील ३ आरोपींना केले अटक

खोपोली शहरातून रेमेडीसीवर इंजेक्शनचा वाढीव दराने व अवैध मार्गाने खरेदी - विक्री करणाऱ्या तीन तरूणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून नऊ इंजेक्शन जप्त केली आहेत. आरोपींना जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली असून या प्रकरणी स्वप्निल देशमुुख (गुरव), आकाश कलवार, विनोद जाखोटीया सर्व राहणार खोपोली ता. खालापुर, जि. रायगड यांना अटक करण्यात आली आहे.

कठोर कारवाईची होतोय मागणी

सदरील बाब ही अतिशय चुकीची असल्याने खोपोली शहरातून अनेकांनी या तीन आरोपींवर संताप व्यक्त करत यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विविध माध्यमातून होत आहे. याबाबत पुढाकार घेऊन राजे प्रतिष्ठान खालापूर तालुका अध्यक्ष राकेश मिरवणकर, खोपोली शहर अध्यक्ष नीलेश मोडवे, पदाधिकारी इरफान शेख , शिवसेना खोपोली उपशहर अध्यक्ष अनिल सानप , पत्रकार आकाश जाधव यांनी खोपोली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांना ३ मे रोजी निवेदन दिले.

तर खोपोली शहरातील अनेक रुग्णांना या इंजेक्शनची गरज आहे या करिता रूग्णांचे नातेवाईक इंजेक्शनच्या शोधात फिरत आहे. परंतु त्यांना ते उपलब्ध होत नाही. आणि या आरोपींनी रेमेडीसीवर इंजेक्शनची शहराबाहेर अवैध मार्गाने विक्री करून काळाबाजार केला, ही संतापजनक बाब असल्याने यांच्यावर कडक शासन झाले पाहिजे, असे राजे प्रतिष्ठानचे खालापूर तालुका अध्यक्ष राकेश मिरवणकर यांनी संताप व्यक्त केले.

तसेच प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे, रेमेडीसीवर इंजेक्शनची खरेदी-विक्री काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खोपोलीमधील तीन आरोपी यांच्या सह आणखी कोण आहेत का ? असतील तर त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपशहरअध्यक्ष अनिल सानप यांनी भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा - रायगड : सरकारचा निषेध व्यक्त करत पत्रकारांनी केले आत्मक्लेष आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.