रायगड - स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावरील चित्त दरवाजा व राजमाता जिजाऊ यांच्या समाधी जवळ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित शेकडो दिवे लावण्यात आले. दिव्यानमुळे चित्त दरवाजा जवळील पायाऱ्या आणि राजमाता जिजाऊ यांचा समाधी परिसर उजळून गेला, हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी किल्ले रायगडच्या पायथ्याशी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी राजमाता जिजाऊ समाधीजवळ मावळा संघटना रायगड, कोकणकडा मित्र मंडाळाचे दिपक शिंदे, महेश मोरे यांनी उपस्थित असलेल्या शिवभक्तांना मार्गदर्शन केले. हे दृश्य पहण्यासाठी हजारो शिभक्त रायगड किल्याच्या पायथ्याशी हजर होते.