ETV Bharat / state

लसीच्या तुटवाड्याने उरणमध्ये कोरोना लसीकरण बंदच; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

author img

By

Published : May 5, 2021, 8:42 AM IST

लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याने, उरण तालुक्यातील लसीकरण मागील पाच दिवसांपासून बंदच आहे. तर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना एकही डोस न मिळाल्याने नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

कोरोना लसीकरण बंदच
कोरोना लसीकरण बंदच

उरण (रायगड) -कोरोना विषाणूपासून सुरक्षीत राहण्यासाठी शासनाकडून को-वॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड अशा दोन लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याने, उरण तालुक्यातील लसीकरण मागील पाच दिवसांपासून बंदच आहे. तर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना एकही डोस न मिळाल्याने नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

पाच दिवस लसीकरण बंद

उरणमध्ये १ मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात येणार होते. मात्र लसीचा तुटवडा असल्याने हे लसीकरण बंदच ठेवण्यात आले आहे. उरण शहरातील RH आणि RH2 या केंद्रांना फक्त १०० डोस येत असल्याने दररोज रांग लावून डोस न मिळणाऱ्या नागरिकांची लसीकरणाबाबत चिडचिड होत असताना, नाराजीचा सूर उमटत आहे.

लसीबाबत असणारे गैरसमज दूर होऊन, लस घेणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्याने या केंद्रांवर गर्दी होत असताना, लसीकरण बंद असणे हे प्रशासनाचे अपयश असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर पहिला आणि दुसरा डोस यांचे नियोजन न झाल्याने, या केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण होणार आहे. यामुळे ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे ते इतर अनेकजण लस कधी येईल याची वाट पहात आहेत.

याबाबत आरोग्य विभागाचे डॉ. ईटकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यातच लस नसल्याकारणाने उरणमध्ये लसीकरण बंद असल्याची माहिती दिली. जिल्ह्याकडून लस कधी उपलब्ध होईल याची निश्चित अशी माहिती नाही. ज्यावेळी लस उपलब्ध होईल त्यावेळी उरणला लसीकरण सुरू होईल. तोपर्यंत वाट पहावी लागेल असे डॉ. ईटकर यांनी ईटीव्ह भारतशी बोलताना सांगितले.

१०० डोस कुणाला देणार?

शासनाने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. उरणमधील या केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने शेकडो नागरिक या केंद्रांवर येऊन परत जात आहेत. मुळात दुसरा डोस पूर्ण न झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असताना, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना डोस देण्याची घोषणा करताना पुरेशी लस उपलब्ध होणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने आता पहिला डोस, दुसरा डोस आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक यांची गर्दी होणार आहे. यामुळे या केंद्रांवर येणाऱ्या १०० डोस कुणाला देणार हा एक मोठा प्रश्नच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.